Saturday , 30 September 2023
Home Sports Asian Games Team India Squad : ऋतुराज गायकवाड भारतीय संघाचा नवा कॅप्टन; एशियन गेम्ससाठी भारतीय संघाची घोषणा.
Sports

Asian Games Team India Squad : ऋतुराज गायकवाड भारतीय संघाचा नवा कॅप्टन; एशियन गेम्ससाठी भारतीय संघाची घोषणा.

Asian Games Team India Squad
Asian Games Team India Squad : FLetstalk

Asian Games Team India Squad : 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी (19th Asian Games) बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी ऋतूराज गायकवाडकडे कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. ही स्पर्धा 28 सप्टेबर ते 8 ऑक्टोबर या कालावधी दरम्यान होणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये ह्यावेळी पहिल्यांदा क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेमध्ये भारताचे महिला आणि पुरुष हे दोन्ही संघ सामील होणार आहेत.

Asian Games Team India Squad
Asian Games Team India Squad : FLetstalk

Asian Games Team India Squad : ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद

एशियन गेम्ससाठी भारताचा युवा बॅट्समन ऋतुराज गायकवाड याकडे कर्णधारपद देण्यात आलं आहे. अपेक्षा होती की, अनुभवी शिखर धवन भारतीय संघात पुन्हा पुनरागमन करेल आणि त्याच्याकडे कर्णधारपद दिले जाईल. पण तसं न करता निवड समितीने भविष्याचा विचार करता शिखर धवनला डावलून युवा नेतृत्वाकडे संघाची धुरा सोपवली आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये भारतीय संघाला सुवर्णपदक जिंकून देऊन भविष्यतील कर्णधार पदावर दावेदारी सिद्ध करण्याची ही ऋतुराज गायकवाडकडे मोठी संधी असणार आहे.

हे वाचा: India squad Announced for T-20 series : वेस्ट इंडिज सोबतच्या T-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; तिलक वर्मा, यशस्वीला संधी.

हेही वाचा : How to get Credit Card : क्रेडिट कार्ड म्हणजे नेमकं काय? क्रेडिटकार्ड कसं मिळत? जाणून घ्या 

Asian Games Team India Squad : आयपीएलमधील युवा स्टार खेळाडूंना संधी

आशियाई क्रीडा स्पर्धा सप्टेबर ते ऑक्टोबर या महिन्यात होणार आहे परंतु याच महिन्यात भारतामध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप (ICC World cup 2023) होणार आहे, त्यामुळे भारताचा मुख्य संघ हा वर्ल्डकपमध्ये गुंतलेला असणार आहे. ह्यामुळे एशियन गेम्ससाठी भारताचा दुसरा संघ पाठवण्यात आला आहे. या भारतीय संघामध्ये आयपीएलमधील (IPL 2023) काही युवा स्टार खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यात रिंकू सिंह, तिलक वर्मा विदर्भाचा जितेश शर्मा, मुकेश कुमार, शिवम मावी यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.

Asian Games Team India Squad
Asian Games Team India Squad : FLetstalk

Asian Games Team India Squad : महिलांच्या संघाची देखील घोषणा :

आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला संघांची देखील घोषणा बीसीसीआयने केली आहे. भारतीय संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे देण्यात आलं आहे तर उपकर्णधारपद स्मृती मंधानाकडे देण्यात आलं आहे. या संघामध्ये देखील काहीसे फेरबदल झाले आहेत. तर कसे आहेत पुरुष आणि महिलांचे संघ?

हे वाचा: ICC World Cup Rivalries : यंदाच्या वर्ड कपमधील काही हाय व्होल्टेज सामने.

Asian Games Team India Squad : असा आहे भारतीय पुरुष संघ :

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), तिलक वर्मा, राहुल त्रिपाठी, यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, शाहबाज अहमद, अर्शदीप सिंह, शिवम मावी, आवेश खान, मुकेश कुमार, प्रभसिमरन सिंह (विकेटकिपर), जितेश शर्मा (विकेटकिपर)

राखीव खेळाडू : साई सुदर्शन, दीपक हुड्डा, वेंकटेश अय्यर, यश ठाकूर, साई किशोर

Asian Games Team India Squad

हे वाचा: ICC Cricket World Cup Facts : ICC क्रिकेट वर्ल्ड कपबद्दल काही रंजक गोष्टी.

Asian Games Team India Squad : असा आहे भारतीय महिला संघ :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), अमनजोत कौर, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), देविका वैद्य, राजेश्वरी गायकवाड, अंजली सर्वाणी, तितास साधू, मिन्नू मानी, कनिका आहूजा, उमा छेत्री, अनुषा बरेड्डी

राखीव खेळाडू : हरलीन देओल, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर काशवी गौतम आणि साइका इशाक

Related Articles

ICC World Cup Rivalries
Sports

ICC World Cup Rivalries : यंदाच्या वर्ड कपमधील काही हाय व्होल्टेज सामने.

ICC World Cup Rivalries : क्रिकेट हा नावीन्य पूर्ण संस्कृतीने नटलेला एक...

ICC Cricket World Cup Facts
Sports

ICC Cricket World Cup Facts : ICC क्रिकेट वर्ल्ड कपबद्दल काही रंजक गोष्टी.

ICC Cricket World Cup Facts : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप (ICC Cricket...

Team India
Sportsघडामोडी

टीम इंडिया क्रिकेट वर्ल्ड कपसाठी रेडी – Cricket World Cup 2023 – Team India

टीम इंडिया क्रिकेट वर्ल्ड कपसाठी रेडी – Cricket World Cup 2023 –...