Friday , 3 May 2024
Home Sports India squad Announced for T-20 series : वेस्ट इंडिज सोबतच्या T-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; तिलक वर्मा, यशस्वीला संधी.
Sportsघडामोडी

India squad Announced for T-20 series : वेस्ट इंडिज सोबतच्या T-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; तिलक वर्मा, यशस्वीला संधी.

India squad Announced for T-20 series
India squad Announced for T-20 series : LEtstalk

India squad Announced for T-20 series : बीसीसीआयने वेस्ट इंडिज (India vs West indies) सोबतच्या पाच T-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची काल उशिरा घोषणा केली आहे. यात संघामध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. तसेच काही नव्या चेहऱ्यांना देखील संघामध्ये जागा देण्यात आली आहे. यासोबतच आगामी आशिया कप आणि वर्ल्ड कपचा विचार करता संघाच्या महत्वाच्या सिनियर खेळाडूंना आराम देण्यात आला आहे.

India squad Announced for T-20 series
india vs west indies 

India squad Announced for T-20 series : हार्दिक पांड्याकडे नेतृत्वाची जवाबदारी :

रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये भारतचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याकडे कर्णधार पदाची जवाबदारी देण्यात आली आहे. तसेच मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव याला उपकर्णधारपदाची जवाबदारी देण्यात आली आहे.

हे वाचा: Sangharshyodhha Manoj Jarange Patil : 'संघर्षयोद्धा'

India squad Announced for T-20 series : सिनिअर खेळाडूंना विश्रांती :

आगामी आशिया कप आणि वर्ल्ड कपचा विचार करता संघाच्या महत्वाच्या सिनियर खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. यामध्ये कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे.

नव्या चेहऱ्यांना संधी तर काहींना डावलले :

Yashasvi Jaiswal, Tilak Varma earn call-ups as BCCI names India's T20I squad for West Indies tour | Cricket Times

देशांतर्गत स्पर्धांमध्ये आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या काही युवा खेळाडूंना या T-20 (India vs West indies) संघात स्थान देण्यात आले आहे. यामध्ये तिलक वर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांचा समावेश आहे. तर आयपीएलमध्ये दमदार खेळी करणारा विदर्भाचा युवा खेळाडू जितेश शर्मा आणि सलग 5 षटकार ठोकणारा मॅच विनर खेळाडू रिंकू सिंह यांना मात्र सांध्यात स्थान देण्यात आले नाही. यासोबतच ऋतुराज गायकवाड आणि शार्दूल ठाकूर यांच्याही नावाचा विचार या मालिकेसाठी करण्यात आला नाही.

हे वाचा: India vs Pakistan Football Match : भारत-पाकिस्तनाच्या सामन्यात तुफान राडा; धक्काबुक्कीचा Video व्हायरल.

या खेळाडूंचं पुनरागमन :

Sanju Samson: Samson's generosity.. Rs. 2 crores.. You are super bro Antonna netizens.. – Telugu News |

वेस्ट इंडिज सोबतच्या T-20 मालिकेसाठी (India vs West indies)  काही खेळाडूंचं पुनरागमन करण्यात आलं आहे. यामध्ये संजू सॅमसन, रवी बिष्णोई आणि अर्शदीप सिंह यांच्या नावाचा समावेश आहे. तर कसा आहे भारतीय संघ? पाहा…

India squad Announced for T-20 series : भारतीय संघ –

इशान किशन (WC) , शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (VC), संजू सॅमसन (WC), हार्दिक पांड्या (C), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार

हेही वाचा : आर्थिक नियोजनात पडणारे साधे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

India squad Announced for T-20 series : T-20 सामन्याचे वेळापत्रक

  1. पहिला सामना : 3 ऑगस्ट 2023 (ब्रायन लारा क्रिकेट अॅकेडमी, त्रिनिदाद)
  2. दुसरा सामना : 6 ऑगस्ट 2023 (नॅशनल स्टेडिअम, गयाना)
  3. तिसरा सामना : 8 ऑगस्ट 2023 (नॅशनल स्टेडिअम, गयाना)
  4. चौथा सामना : 12 ऑगस्ट 2023 (सेन्ट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम, फ्लोरिडा)
  5. पाचवा सामना : 13 ऑगस्ट 2023 (सेन्ट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम, फ्लोरिडा )

सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 8 वाजता सुरु होतील.







Subscribe Now

    Subscribe to our mailing list to receives daily updates direct to your inbox!

    Related Articles

    T20 World Cup 2024 Timetable
    Sports

    T20 World Cup 2024 Timetable : भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार पुन्हा रंगणार; T20 वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर

    T20 World Cup 2024 Timetable : भारत पाकिस्तान सामन्याचा थरार पुन्हा रंगणार...

    IPL Auction 2024
    Sports

    IPL Auction 2024 : आयपीएलचा ऐतिहासिक लिलाव : कोणत्या संघाने कोणते खेळाडू घेतले विकत? पाहा संपूर्ण लिस्ट

    IPL Auction 2024 : आयपीएलचा लिलाव नुकताच दुबईमध्ये पार पडला. ह्या वर्षी...