World Ozone Day : जागतिक ओझोन दिवस
जागतिक ओझोन दिवस दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. पृथ्वीच्या आवरणाभोवतीच्या ओझोन थराच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांना हा थर संरक्षित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
१९८७मध्ये मॉन्ट्रियल शहरात झालेल्या करारानुसार हा दिवस साजरा केला जातो. १९८७मध्ये या तारखेला या प्रोटोकॉलवर स्वाक्षरी करण्यात आली. मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचे उद्दीष्ट वैज्ञानिक ज्ञान आणि तांत्रिक माहितीच्या विकासावर आधारित उपाययोजना करून ओझोन थराचे संरक्षण करणे आहे.
ओझोन वातावरणात अगदी कमी प्रमाणात आढळतो. सूर्याच्या अतिनील किरणांपासून ओझोन थर पृथ्वीचे रक्षण करत असतो. सूर्यापासून निघणाऱ्या या किरणांमुळे त्वचेचे अनेक आजार उद्भवू शकतात. सतत वाढतच जाणारे प्रदूषण आणि बेसुमार वृक्षतोड यामुळे पृथ्वी भोवतालच्या वायुमंडलातील ओझोनचा थर कमी होतो आहे.
ओझोन थर नाजूक ढाल बनून सूर्याच्या किरणांच्या हानिकारक भागापासून पृथ्वीचे रक्षण करते आणि ग्रहावरील जीवन टिकवून ठेवण्यास मदत करते. ओझोन-क्षीण करणाऱ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने आपल्या आयुष्यातून काढून टाकल्या पाहिजेत.
हे वाचा: What precautions should be taken while buying food? : खाद्यपदार्थ विकत घेताना काय काळजी घ्यावी?