Rain Update : संपूर्ण ऑगस्ट महिना दडी मारून बसलेला पाऊस आता पुन्हा चांगलाच सक्रिय झाला आहे. राज्यातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच उद्यापासून पुढील 3 दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Rain Update : राज्यात कुठे कुठे पाऊस पडणार?
पुढील काही दिवस पाऊस अति सक्रिय राहणार आहे, अशी माहिती हवामान खात्यातील तज्ज्ञांनी दिली आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने म्हटलं आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार उद्यापासून 29 सप्टेंबर पर्यंत कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस सक्रिय राहणार आहे.
तर 24 सप्टेंबरनंतर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या अरबी सुमद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 26 सप्टेंबर मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Learn and Earn Scheme : विद्यार्थ्यांसाठी शिका आणि कमवा योजना.
आज संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच 24 सप्टेंबर ते 26 संपूर्ण राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
हे वाचा: Bullock Cart Race : ब्रेकिंग..! आता बैलगाडा शर्यतीचा नाद घुमणार; सुप्रीम कोर्टाची परवानगी.
दरम्यान जवळपास दीड महिना दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.