Ahmednagar Gold Silver Price : नवरात्र उत्सव आणि दिवाळी सुरू हाेतेय. या दाेन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर साेने-चांदीचा भाव गेल्या 7 महिन्यात नीचांकी पातळीवर घसरले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या सात दिवसांपासून साेने-चांदीच्या दरात सातत्याने घसरण नाेंदवली जात आहे.
Ahmednagar Gold Silver Price : आजचा सोन्या चांदीचा भाव
अहमदनगरमध्ये आज 24 कॅरेटचे साेन्याचा प्रतिताेळा (10 ग्रॅम) भाव 56 हजार 800 रुपये एवढा आहे. चांगली दर्जाची चांदी ही 68 हजार रुपये किलाे आहे. साेन्याच्या भावात दाेन दिवसांपासून सातत्याने घसरण हाेत आहे. जागतिक बाजारपेठेत देखील साेन्याचा भाव घसरले आहेत. साेन्याचे भाव 1815 डॉलर प्रतिऔसपर्यंत खाली घसरले आहेत. हा गेल्या सात महिन्यातील नीचांकी दर आहे.
हे वाचा: Top 5 Rice Brands in India : भारतातील सुप्रसिद्ध Rice ब्रँड्स कोणते? जाणून घ्या.
Ahmednagar Gold Silver Price : सोन्या चांदीच्या भावात आणखी घसरण होण्याची शक्यता
साेन्याच्या भाव आगामी काळात आणखी घसरण हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे साेने आणखी स्वस्त हाेईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या पितृपक्ष पंधरवाडा सुरू आहे. या काळात बाजारपेठेत काहीसा मंद काळ असताे. यानंतर नवरात्र उत्सव सुरू हाेताे. तसेच दिवाळीची लगबग सुरू हाेते. या सण उत्सवाच्या काळात साेने-चांदीचे भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे.
Gold Silver Rate : जागतिक बाजारपेठेत साेन्या-चांदीचे भाव घसरले
साेने-चांदीच्या भावात सातत्याने घसरण हाेत आहे. सध्या जागतिक बाजारपेठेत साेन्या-चांदीचे भाव घसरले आहे. त्या घसरणीचा परिणाम पुढील काही दिवस राहू शकताे. परिणामी दसरा-दिवाळी काळात साेन्या-चांदीचे भाव आणखी घसरू शकतात.
हे वाचा: Oscar : ऑस्कर विजेत्यांना नक्की काय-काय मिळते? वाचा ए टू झेड बाबी…
त्यामुळे ग्राहकांना साेने-चांदी खरेदीसाठी चांगली संधी राहिल. गेल्या सहा-सात महिन्यांपासून साेने-चांदीच्या भावात सातत्याने घसरण हाेत आहे. त्याचा फायदा ग्राहकांना हाेऊ शकताे. दिवाळी, लग्नसराईसाठी साेने खरेदी करायचे असेल, तर आता घसरलेल्या भावात करता येईल, असे अहमदनगरचे सराफ सागर कायगांवकर यांनी म्हंटले.