Global Health Issues : अलिकडच्या वर्षांत जगाला अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, 2020 हे वर्ष जागतिक आरोग्यासाठी विनाशकारी वर्ष होते. अज्ञात विषाणू जगभरात पसरला होता, तो वेगाने आरोग्य यंत्रणेतील अपुरेपणा उघड करत होता. कोविड-19 (साथीचा रोग) सर्व जगभर पसरलेला आजार होता.
COVID-19 व्यतिरिक्त, जगभरातील लोकांवर इतर अनेक समस्या आरोग्याशी निगडित आहेत ज्यांचा दूरगामी परिणाम होतो आहे. WHO ने 2021 मध्ये काही जागतिक आरोग्य समस्यांची (Global Health Issues) यादी केलेली आहे.
हे वाचा: Which Fridge should you Buy? : फ्रिज घेताय? कोणता फ्रिज घ्यावा?
Global Health Issues : त्या समस्या ज्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते
हवामान बदल आणि आरोग्य (Climate Change) :
हवामानातील बदल मानवी आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम करत आहेत. वातावरणातून णज आजार हळूहळू मानवाच्या शरीरात प्रवेश करत आहेत. एखाद्या भागातला प्रचंड प्रमाणात पाऊस, एखाद्या भागातली अति प्रमाणातील उष्णता, काही ठिकाणी पडलेला दुष्काळ जो वाढत जातो आहे अश्या वातावरणीय समस्या भेडसावणे सुरु झाले आहे.
Global Health Issues : संसर्गजन्य रोग (Infectious Diseases)
संसर्गजन्य रोगांमुळे जागतिक आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. COVID-19 सारख्या नवीन संसर्गजन्य रोगांचा उदय हा साथीची लाट किती वेगाने पसरते ह्याचा अंदाज आपल्याला देते. अश्या प्रकारच्या साथीच्या रोगांसाठी प्रत्येकी व्यवस्थेने तयार असले पाहिजे हेच खरे.
Global Health Issues : मानसिक आरोग्य (Mental Health)
मानसिक आरोग्य विकार हे जगभरातील लोकांमध्ये वाढते लक्षण आहे. जगभरातील चिंता आणि नैराश्याचे प्रमाण वाढल्याने कोविड-19 साथीच्या आजाराचा मानसिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम झाला आहे.
हे वाचा: 6 Budget Friendly Furniture Ideas : बजेट फ्रेंडली फर्निचर आयडिया.
Global Health Issues : असंसर्गजन्य रोग (Noncommunicable Diseases)
कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकार यासारखे असंसर्गजन्य रोग जगभरातील बहुसंख्य मृत्यूंना कारणीभूत आहेत. जीवनशैली विषयक आजारांची वाढती संख्या हा आजच्या काळातला मोठा प्रश्न आहे.
Global Health Issues : रुग्ण सुरक्षा (Patient Safety)
रुग्णांची सुरक्षा ही एक महत्त्वाची समस्या आहे जी जगभरातील आरोग्य सेवा प्रणालींवर परिणाम करते. वैद्यकीय त्रुटी आणि मूलभूत व्यवस्थेचा अभाव ह्या आरोग्य सेवेत मृत्यू आणि दुखापतीचे प्रमुख कारण आहेत.
युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज : Universal health coverage
सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. ज्याचा उद्देश सर्व स्तरातल्या लोकांना आर्थिक अडचणींशिवाय दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याची यंत्रणा उभी करणे आहे.
हे वाचा: How to Remove Tan From Skin? : चेहरा, हात टॅन झालेत? कोणते उपाय केले पाहिजे? जाणून घ्या.
हेही वाचा : Best Health Insurance Company : भारतातली सध्याची सर्वात लाडकी हेल्थ इन्शुरन्स कंपनी.
लसीचा संकोच (Vaccine Hesitancy)
लस घेण्यास संकोच करणे ही जगभरातील चिंतेची बाब आहे. संसर्गजन्य रोगांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी लोकांना आवश्यक असलेल्या लसी नियमित आणि वेळेत मिळतील याची खात्री केली पाहिजे. लोकांनी सुद्धा लस घेण्यास टाळाटाळ करणे थांबवले पाहिजे.
Global Health Issues : वर्कफोर्स डेव्हलपमेंट (Workforce Development)
वर्कफोर्स डेव्हलपमेंट ही जगभरातील एक महत्त्वाची समस्या आहे. जगभरातील आरोग्य सेवा यंत्रणा मनुष्यबळाच्या कँटरतेने प्रभावित आहेत. जगाच्या अनेक भागांमध्ये आरोग्यसेवा कर्मचार्यांची कमतरता आहे, ज्यामुळे प्रत्येकवेळी प्रत्येकठिकाणी आरोग्यसेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकत नाहीत.
म्हणजे काय तर येत्या काळात आरोग्याशी निगडित अनेक समस्या मानव जातीला भेडसावणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला तयार असणे आवश्यक आहे. प्रतिकारशक्ती वाढवून आजार आणि साथीच्या रोगांना अटकाव करणे हाच महत्वाचा मूलमंत्र WHO देते.