World Asthma Day : जागतिक अस्थमा दिन (World Asthma Day) हा दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी असतो. जगभरातील लाखो लोकांना होणारा अस्थमा हा एक तीव्र श्वसनाचा आजार आहे, याविषयी जागरुकता निर्माण केली जावी ह्या उद्देशाने जागतिक अस्थमा दिनाचे आयोजन केले जाते. ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमा (GINA) द्वारे आरोग्य सेवा संस्था, डॉक्टर्स गट आणि जगभरातील अस्थमा पीडित यांच्या सहकार्याने या दिवसाचे आयोजन केले जाते.
हेही वाचा – Mutual Funds : म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकीबाबत कोणतं राज्य आहे आघाडीवर?
हे वाचा: The Books We Read Too Late And That You Should Read Now
दमा हा श्वसनमार्गाचा जळजळ आणि श्वसन मार्ग अरुंद होण्याचा एक तीव्र आजार आहे. पीडित व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो, घरघर आवाज येतो, छातीत घट्टपणा आणि खोकला येतो. हा त्रास सर्व वयोगटातील लोकांना होतो / होऊ शकतो. वायू प्रदूषण, ऍलर्जी निर्माण करणारे घटक, व्यायामाचा अभाव आणि तणाव यासारख्या विविध कारणांमुळे अस्थमाचा त्रास होऊ शकते.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, अस्थमा जगभरातील सुमारे 235 दशलक्ष लोकांना प्रभावित करतो आणि दरवर्षी अंदाजे 3,83,000 मृत्यूचे कारण बनते. दम्याचे प्रमाण वाढणारे आहे, विशेषत: कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, जिथे आरोग्यसेवा आणि औषधोपचार मर्यादित आहेत अश्या ठिकाणी हे प्रमाण लक्षणीय आहे.
जागतिक दमा दिन 2023ची थीम “अस्थमाविषयी गैरसमज कमी करणे” आहे. या आजाराविषयी जागरूकता आणि त्याविषयी लोकांची समज वाढवणे तसेच अस्थमाबद्दलच्या सामान्य गैरसमजांना कमी करणे हे उद्दिष्ट आहे. यापैकी काही गैरसमज –
हे वाचा: Recharge plan : सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन कोणाचा? एअरटेल, जिओ की वोडाफोन-आयडिया…
World Asthma Day : गैरसमज नेमके कोणते आहेत?
गैरसमज 1 –
दमा हा फक्त बालपणीचा आजार आहे : दमा कोणत्याही वयात विकसित होऊ शकतो आणि प्रौढत्वापर्यंत टिकून राहू शकतो.
गैरसमज 2 –
दमा असलेल्या लोकांनी व्यायाम टाळावा : दमा असलेल्या लोकांनी आरोग्य चांगले राखण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. कोणता व्यायामप्रकार करावा हे डॉक्टरांकडून समजून घेणे आवश्यक आहे.
गैरसमज 3 –
दमा सांसर्गिक आहे : दमा हा संसर्गजन्य नाही आणि तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकत नाही.
गैरसमज 4 –
दमा हा गंभीर आजार नाही : दमा हा जीवघेणा असू शकतो, विशेषत: उपचार न केल्यास.
अस्थमाबद्दल जागरूकता वाढवणे, गैरसमज दूर करणे आणि अस्थमा रोगाचे उत्तम व्यवस्थापन आणि नियंत्रणास प्रोत्साहन देणे ह्या पुढील काळातल्या आव्हानांना सामोरे जायला हवं.