महाराष्ट्रात अंगणवाड्या या केंद्राकडून पुरस्कार प्राप्त योजनेतून या चालवल्या जातात. याच कारणास्तव ग्रामीण भागात शैक्षणिकदृष्ट्या महत्त्व अधिक आहे. 2020 साली नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविले गेले. त्यामुळे अंगणवाड्यांचा विकास करण्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार लक्ष घालताना दिसत आहे. म्हणून आता अंगणवाडीत 20 हजार 601 जूनी रिक्त पदे भरली जाणार आहेत.
माहितीनुसार, आता महाराष्ट्रातील सर्व भागात असणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये रिक्त असणारी पदे भरली जाणार आहेत. अंगणवाड्यांचे महत्त्व हे ग्रामीण भागांमध्ये मोठं आहे. त्यातून महाराष्ट्रातील अनेक भागात अंगणवाडी कमी आहेत. त्यांचे महत्त्व रोजगाराच्या आणि शिक्षणाच्या दृष्टीनं अधिक आहे त्यामुळे महाराष्ट्रातील महसुली गावात जिथे अंगणवाडी नसतील तिथे नव्या अंगणवाड्याही उघडल्या जातील.
हे वाचा: Chaturmas : लग्न तिथी कमी, चिंता करु नका; चातुर्मासातही 37 तिथी…
कोणत्या पदांची भरती? : माहितीनुसार अंगणवाड्यांमध्ये 2017 पासून पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकूण 20 हजार पदे भरली जाणार आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविकांचाही समावेश आहे. 2023 च्या 31 मे पूर्वी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांची पदे भरण्याचे आदेश आहेत. हे आदेश एकात्मिक बालविकास आयुक्त रूबल अग्रवाल यांच्याकडून देण्यात आलेत. यासाठी सर्व जिल्हा परिषदांना अपडेटही करण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता काय? : अंगणवाडी सेविकांसाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणतीही पदवी, पद्यूत्तर पदवी, उच्च शिक्षणही ग्राह्य धरले जाईल. त्याप्रमाणे किमान वयोमर्यादा ही 35 वर्षे असणं अनिवार्य आहे.
कोणकोणत्या पदांना मंजूरी? :
मिनी अंगणवाडी सेविका – 13 हजार 11
अंगणवाडी मदतनीस – 2 लाख 7 हजार
अंगणवाडी सेविका – 97 हजार 475
एकूण रिक्त पदे – 20 हजार 601 पदे