G20 Summit 2023 – आजपासून दिल्लीत G20 परिषद सुरु झाली.
कोण कोणते देश आहेत सहभागी ह्यामध्ये?
सभासद देशांची नावे खालील प्रमाणे
सौदी अरेबिया
साऊथ आफ्रिका
टर्की
यूएसए
युके
चायना
फ्रांस
जर्मनी
इंडोनेशिया
इटली
जपान
मेक्सिको
साऊथ कोरिया
रशिया
& युरोपियन युनियन
हे वाचा: 6 एप्रिल 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…
आज G20 परिषदेला सुरुवात झाली.
मोरोक्कोत झालेल्या भूकंपात जीव गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करून आपल्या भाषणाची सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. अडीच हजार वर्षांपूर्वी भारताने जगाला एक संदेश दिला होता, ‘मानवतेचं कल्याण व सुख नेहमीच सुनिश्चित केलं जायला हवं’ या संदेशाला आठवून G20 Summit 2023 परिषदेला सुरुवात करुयात अशी सुरुवात नरेंद मोदींनी केली.
पंतप्रधान पुढे म्हणाले कोरोना महामारीवेळी जगावर मोठं संकट आले होते, त्यावेळी विश्वासाचा अभाव असल्याचे जाणवलं. पण अविश्वासाला आता विश्वासाने जिंकायचे आहे. आपण कोरोनाला हरवू शकतो, तर अविश्वासाच्या संकटालाही हरवू शकतो, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. सर्वांनी मिळून ग्लोबल ट्रस्ट डेफिसिटला विश्वासात बदलूयात. सर्वांना सोबत घेऊन चालायची ही वेळ आहे असेही पंतप्रधानांनी नमूद केले.
हे वाचा: खासदार-आमदार आणि राष्ट्रपतीही आयकर भरतात का? तरतुदी काय सांगतात?