Job Update : सध्या संपूर्ण जगात आर्थिक मंदीचं संकट आणखी गडद होत चाललं आहे. परिणामी अनेक मोठ्या जागतिक कंपन्यांनी नोकर कपातीचा सपाटा चालूच ठेवला आहे. त्यामुळे अनेक होतकरू कर्मचाऱ्यांना कौशल्य असताना देखील आपल्या नोकरीवर पाणी सोडावं लागलं आहे. अशा परिस्थितीत पुन्हा नोकर भरती सुरु होईल का नाही? असा प्रश्न उपस्थित असताना तरुणांसाठी आता महत्वाची बातमी समोर आली आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात जवळपास 5 हजार जागांसाठी भरती (Job Update) होणार आहे.
इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या माहितीच्या आधारे यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
हे वाचा: Change the color of WhatsApp chat : व्हॉट्सअॅप चॅटचे रंग-रुप बदला, अगदी सोपी ट्रिक माहित करुन घ्या!
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात विविध पदांच्या 4946+ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
पदाचे नाव आणि जागा :
तांत्रिक (टेक्निकल) – 905 जागा.
अतांत्रिक (नॉन टेक्निकल) – 67 जागा.
स्टाफ नर्स – 3974 जागा.
शैक्षणिक पात्रता : येथे चेक करा
हे वाचा: 9 मार्च 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…
वयाची अट
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 मे 2023 रोजी 18 ते 38 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.
परीक्षा शुल्क
अमागास प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये परीक्षा शुल्क आहे तर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपये परीक्षा शुल्क आहे.
अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पहा
हे वाचा: The Supreme Court Has a Perfectly Good Option in Most Divisive
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज – येथे करा.
महत्वाच्या तारखा
वरील भरती प्रक्रियेत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 पर्यंत असणार आहे.
या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.