AHD Maharashtra Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात रिक्त पदांसाठी भरती सुरु झाली असून यासंबंधी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे होतकरू तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी शेक्षणिक पात्रता विविध पदांनुसार वेगवेगळी आहे. तत्पूर्वी या भरतीमध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. हा ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती.
AHD Maharashtra Recruitment 2023 : पशुसंवर्धन विभागात भरती सुरु
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु झालेली आहे. या भरतीप्रक्रियेद्वारे विविध पदांच्या 446 जागा भरल्या जाणार आहे. यामध्ये दहावी, ITI पास ते पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेत भाग घेता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात या भरती बाबतची सविस्तर माहिती
हे वाचा: business : 1 लाख रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय, लग्नाच्या हंगामात बंपर कमाई फिक्स
पदाचे नाव आणि पदसंख्या
पदांचे नाव :
1) पशुधन पर्यवेक्षक
2) वरिष्ठ लिपिक
3) लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क)
4) लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क)
5) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क)
6) तारतंत्री (गट-क)
7) यांत्रिकी (गट-क)
8) बाष्पक परिचर (गट-क)
एकूण जागा : 446 जागा.
हे वाचा: IPL 2023 : आयपीएल 2023 मध्ये कोणता संघ सर्वात बलाढ्य? बेस्ट प्लेईंग 11 ची लिस्ट पाहा…
शैक्षणिक पात्रता :
शैक्षणि पात्रता वरील विविध पदांनुसार वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात पाहावी.
वयाची अट :
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 01 मे 2023 पर्यंत 18 ते 38 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट असणार आहे तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयात 3 वर्षे सूट दिली जाणार आहे.
शुल्क :
SC, ST आणि PWD प्रवर्गासाठी तसेच अनाथ, अपंग उमेदवारांसाठी 900 रुपये शुक्ल असणार आहे तर उर्वरित सर्व प्रवर्गातील म्हणजेच जनरल, OBC आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (EWS) प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
हे वाचा: state bank of india : स्टेट बँकेत बंपर भरती, 41 हजार पगार… वाचा सर्व काही एका क्लिकवर
नोकरी ठिकाण : महाराष्ट्रात कुठेही
AHD Maharashtra Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पहा
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.
ऑनलाईन अर्ज – येथे करा.
AHD Maharashtra Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा
वरील भरती प्रक्रियेत 1 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता.
या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.