PF account :विशेषतः खाजगी क्षेत्रात काम करणारे लोक अनेक नोकऱ्या बदलताना दिसतात. गेल्या काही वर्षांतील आकडेवारीतून तसे स्पष्ट दिसत आहे. जर तुम्हीही नोकरी बदलली असेल किंवा ती बदलणार असाल तर नवीन कंपनी जॉईन केल्यानंतर एक काम अवश्य पूर्ण करा. ते म्हणजे ईपीएफ खाते मर्ज/विलीन करणे. प्रत्येक नवीन कंपनी जॉईन करताना, नवीन पीएफ खाते तुमच्या जुन्या UAN नंबरवरून उघडले जाते. परंतु जुन्या कंपन्यांमध्ये नोकरीदरम्यान जमा झालेला निधी नव्या पीएफ खात्यात जमा होत नाही. त्यामुळे, पीएफ खातेधारकाला ईपीएफओच्या वेबसाईटला भेट देऊन खाते (ईपीएफ खाते मर्ज) विलीन करावे लागेल.
विलीनीकरण ऑनलाईन शक्य : ईपीएफ खाते विलीन झाल्यानंतर, एकूण रक्कम तुमच्या एकाच खात्यात दिसून येईल. तुम्ही तुमचे पीएफ खाते ऑनलाईन सहजपणे मर्ज/विलीन करू शकता. यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. येथे तुम्हाला सर्व्हिस (सेवा)वर जावे लागेल. त्यानंतर एक कर्मचारी एक ईपीएफ खात्यावर जा. यानंतर ईपीएफ खाते विलीन करण्यासाठी फॉर्म उघडेल. येथे तुम्हाला ईपीएफ खात्यातून नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. नंतर UAN आणि वर्तमान सदस्य आयडी प्रविष्ट करा. संपूर्ण तपशील भरल्यानंतर, प्रमाणीकरणासाठी OTPजनरेट केला जाईल. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. ओटीपी क्रमांक टाकताच तुमची जुनी पीएफ खाती दिसू लागतील.
हे वाचा: अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण का येते? जाणून घ्या..
UAN सक्रिय करणे आवश्यक : यानंतर पीएफ खाते क्रमांक भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. खाते विलीन करण्याची तुमची विनंती स्वीकारली जाईल. त्यानंतर काही दिवसांच्या पडताळणीनंतर तुमचे खाते मर्ज/विलीन केले जाईल. तथापि, हे लक्षात ठेवा की ईपीएफशी संबंधित कोणत्याही सुविधेचा ऑनलाईन लाभ घेण्यासाठी, तुम्हाला तुमचा UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) माहित असणे आवश्यक आहे. यासोबतच UAN अॅक्टिव्हेट करणे देखील आवश्यक आहे.
तुमचा UAN नंबर कसा ओळखायचा? : साठी ‘https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/‘ वर जा. त्यानंतर उजव्या बाजूला कर्मचारी लिंक्ड विभागातील ‘नो युअर यूएएन’ क्रमांकावर जा. त्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि कॅप्चा कोड भरावा लागेल. यानंतर रिक्वेस्ट ओटीपीवर जा. आता तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. यावर तुम्हाला तुमचा पीएफ खाते क्रमांक आणि कॅप्चा भरावा लागेल. जन्मतारखेसोबत आधार किंवा पॅन क्रमांक टाकावा लागेल. यानंतर ‘शो माय यूएएन नंबर’ वर तुम्हाला तुमचा UAN नंबर मिळून जाईल.