Morocco Earthquake भूकंपाने हाहाक्कार : मोरोक्कोतला १२० वर्षातील सर्वात मोठा भूकंप
उत्तर आफ्रिकन (North Africa) देश मोरोक्कोमध्ये (Morocco) भूकंप झाला आहे. भारतीय वेळेनुसार आज पहाटे 3 वाजून 41 मिनिटांनी मोरोक्कोत भूकंप झाला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 296 जण मृत्युमुखी तर अनेक जखमी झाले आहेत. अजूनही मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रशासन, पोलीस, स्वयंसेवी संस्थांनी बचावकारी सुरु केले असून मोठ्या ढिगाऱ्यातून लोकांना बाहेर काढणे सुरु आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मराकेश ह्या शहरापासून ७० किमीवर होता. भूकंपाची तीव्रता इतकी मोठी होती की केंद्रबिंदूपासून ३५०किमीवर असणाऱ्या राजधानी पर्यंत ह्याचे धक्के जाणवले.
भूकंपाची तीव्रता 6.8 रिस्टर स्केल इतकी होती.
भूकंपानंतर अनेक इमारती कोसळल्या. गेल्या १२० वर्षातील हा सर्वात मोठा भूकंप आहे, ज्याची तीव्रता सर्वाधिक आहे. भूकंपामुळे शहरातील अनेक जुन्या इमारती क्षणार्धात कोसळल्या. लोकांमध्ये घबराट पसरल्याने लोक सैरावैरा धावत सुटले. क्षणार्धात सगळं ध्वस्त झाले. पुन्हा भूकंप होईल ह्या भीतीने लोक घराबाहेर पडले.
कोसळलेल्या इमारतींचा सगळं राडा रोड मलबा हटवण्याचं काम सुरू झाले आहे. जगभरातून मोरोक्कोला सहकार्य केले जाईल अशी भावना सगळ्यांनी बोलून दाखवली.
पंत्रप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा, भारत मोरोक्कोला सर्वोतोपरी मदत करेल अश्या आशयाचे ट्विट केले केले आहे.
हे वाचा: NABARD Recruitment : ग्रॅज्युएट आहात? मिळेल लाखाच्या घरात पगार