New Parliament Special Session : नवीन संसदेत विशेष अधिवेशन
New Parliament Special Session : नवीन संसदेत विशेष अधिवेशन परवापासून सुरु झाले आहे. केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबरपर्यंत संसदेचं विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याची घोषणा केल्यापासून विरोधकांनी मोदी सरकारवर टीका करयला सुरुवात केली आहे. काल मंगळवारी विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नव्या संसद भवनातून (New Parliament) कामाचा शुभारंभ करण्यात आला. गणेश चतुर्थीच्या मुहूर्त साधून नव्या संसदेत कामकाजाला सुरुवात झाली.
हेही वाचा : Important decisions of Nirmala Sitharaman : निर्मला सीतारामन ह्यांचे लोकप्रिय निर्णय.
जुन्या संसदेला ‘संविधान सदन’ असे संबोधण्यात येईल असे पंतप्रधानांनी सांगितले. संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाचं कामकाज आज बुधवारी सकाळी 11 वाजता सुरू होईल. लोकसभा आणि राज्यसभेत विविध विधेयकं आज मांडण्यात येतील. काही विधेयकांवर संसदेत चर्चा होईल.
आज विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होईल. संविधानाचं 128 वं दुरूस्ती विधेयक असेल. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल (दुरुस्ती) विधेयक, 2023 सभागृहात मांडतील. हे विधेयक मंजूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. महिला आरक्षण विधेयक 3 ऑगस्ट 2023 रोजीच राज्यसभेत मंजूर झालं आहे.
राज्यसभेतही आज काही विधायके मंडळी जातील. राज्यसभेत आज रिपीलिंग अँड अमेन्डिंग बिल, 2023 आणि पोस्ट ऑफिस विधेयक, 2023 सादर केली जाणार आहेत.