Thursday , 8 June 2023
Home Uncategorized Rajasthani Breakfast : राम राम ठाकूरसा…क्या परोसु?? राजस्थामधील काही लोकप्रिय 6 नाश्त्याचे प्रकार.
Uncategorized

Rajasthani Breakfast : राम राम ठाकूरसा…क्या परोसु?? राजस्थामधील काही लोकप्रिय 6 नाश्त्याचे प्रकार.

Rajasthani Breakfast :
Rajasthani Breakfast: Letstalk

Rajasthani Breakfast : राजस्थान हा राजेशाही आणि किल्ल्यांचा प्रदेश. शाही खाद्यपदार्थांसोबतच जनसामान्यांना आवडतील असे पदार्थ पण इथं फेमस आहेत. इथल्या नाश्ता प्रकारात प्रसिद्ध असलेल्या काही डिशेस

Rajasthani Breakfast: Letstalk

Rajasthani Breakfast : राजस्थामधील काही लोकप्रिय नाश्त्याचे प्रकार

Rajasthani Breakfast : प्याज की कचोरी 

प्याज की कचोरी हा राजस्थानमधील एक लोकप्रिय नाश्ता. मसालेदार कांद्याच्या मिश्रणाने भरलेली कचोरी जिचे कवच कुरकुरीत आणि चवीला बहारदार असते. चिंचेच्या किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर खाल्ल्याने चवीची रंगत वाढते.

हे वाचा: तुमच्यासाठी जिओचा बेस्ट रिचार्ज प्लॅन कोणता? एकदा संपूर्ण यादी तपासून पाहा..

हेही वाचा : घरासाठी डाऊन पेमेंट अन बचतीचे नियोजन.

Rajasthani Breakfast : पोहे 

भारतातल्या इतर भागातल्याप्रमाणेच इथेही पोहे लोकप्रिय आहेत. कांदा, बटाटा, कोथिंबीर, लिंबू घातलेले पोहे अनेक घरांची न्याहरी असते.

Rajasthani Breakfast : घेवर 

घेवर हा गोड पदार्थ जो राजस्थानमध्ये तीजेच्या सणकाळात केला जातो. सिल्व्हर वर्ख आणि चिरलेल्या बदामांनी सजवला जातो. रोजच्या सकाळच्या जेवणात घेवर खाणारी मंडळी आहेत.

बाजरीची रोटी 

बाजरीची रोटी म्हणजे भाकरी हा राजस्थानातील प्रमुख न्याहरी समजली जाते. डाळ किंवा एखाद्या रस्सा भाजीसोबत गरम गरम भाकरी हा एक ग्लूटेन-फ्री नाश्ता आहे. सकाळीच भाकरी आणि त्यावर भरपूर तूप आणि सोबत उडदाची शिजवलेली डाळ हा नाश्ता दिवसभर ऊर्जा आणि ताकद देत असल्याने अनेक कष्टकरी मंडळी हा नाश्ता पसंत करतात.

हे वाचा: Debt Market : गुंतवणुकीची संधी शोधताय? डेट मार्केटबद्दल वाचून तुमचा शोध संपेल..

बेसन चिल्ला 

बेसन चिल्ला म्हणजे हरबरा डाळीचे धिरडे. हा एक आरोग्यदायी नाश्ता पर्याय आहे ज्यात प्रथिने जास्त आहे. हे सहसा हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर हे धिरडे खाल्ले जातात.

जोधपुरी मिर्ची वडा 

जोधपुरी मिर्ची वडा हा एक लोकप्रिय प्रकार आहे. हिरवी मिरची, बेसन आणि मसाल्यांनी बनवलेला वडा. मिरची मसाल्यांनी भरून डाळीच्या पिठात घोळून तळून चिंचेच्या चटणीबरोबर खायला देतात.

ह्याच सोबत मुगाच्या डाळीचे वडे, थंडाई, पुरी भाजी, मिश्र भाज्यांची टिक्की असे अनेक रुचकर पदार्थ राजस्थानात मिळतात. कभी राजस्थान में जाओ तो जरूर ट्राय करो.

हे वाचा: Rashi Bhavishya : 26 मार्च 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…

Related Articles

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.
Uncategorized

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु. पशुसंवर्धन...

Uncategorized

Job Update : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात विविध पदांसाठी भरती सुरु.

Job Update : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात जवळपास 5 हजार विविध...

Uncategorized

EV Market :EV चे मार्केट आहे फुल्ल जोरात

EV market : इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) बाजारपेठेत लक्षणीय वाढ होते आहे आणि...

मसालेदार मार्केट
Uncategorized

Spicy Market : मसालेदार मार्केट.

Spicy Market : भारतीय मसाल्यांचे मार्केट आता चांगलेच लोकप्रिय झालेले आहे. हा...