Take a fresh look at your lifestyle.

26 February 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…

0

26 February 2023

मेष : आज प्रेमप्रकरणात अनुकूलता राहील. तुम्हाला विविध मार्गांमधून पैसा मिळेल. तुमचे आरोग्य कमजोर राहील. आळशी होऊ नका व्यापार-व्यवसायात अपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. भाऊ मदत करतील. मालमत्तेच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा.

वृषभ : तुमची प्रॉपर्टीची कामे लाभ देतील. बेरोजगारी दूर होईल. पैसा येत राहील. जोखमीचे आणि जामीनाचे काम करू नका. ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करा, यश मिळेल. शुभ कार्यात व्यस्त राहिल्याने तुम्हाला यश आणि सन्मान मिळू शकेल. व्यावसायिक निर्णय घेण्यास उशीर करू नका.

मिथुन : तुम्हाला रचनात्मक कार्यात यश मिळेल. एखाद्या उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल. घराबाहेर आनंद राहील. तुमची वागणूक आणि कार्यक्षमतेला अधिकारी वर्गाकडून सहकार्य मिळेल. मुलांच्या कृतींवर लक्ष ठेवा. भांडवली गुंतवणूक वाढेल.

कर्क : आज तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला एखादी दु:खद बातमी मिळू शकते. चिंता कायम राहील. व्यापार-व्यवसायात सावध राहा. वास्तवाला महत्त्व द्या. प्रयत्नांमध्ये यश मिळण्याची शक्यता कमी आहे. कुटुंबात वादाचे वातावरण असू शकते.

सिंह : आज तुम्हाला मेहनतीचे फळ मिळेल. कर्तृत्वाने आनंदी राहाल. प्रतिष्ठा वाढेल. शत्रू शांत राहतील. पैसा मिळेल. आज विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. बुद्धिमत्ता आणि मनोबल वाढल्याने सुख समृद्धी वाढेल. व्यवसायात कामाचा विस्तार होईल. नातेवाईक भेटतील.

कन्या : आज तुमच्याकडे पाहुण्यांची वर्दळ राहील. उत्साहवर्धक माहिती मिळेल. तुमचे मूल्य वाढेल. जोखमीच्या कामांपासून दूर राहा. कुटुंबात सहकार्याचे वातावरण राहील. इच्छित कार्य पूर्ण होण्याची शक्यता आहे. गोंधळापासून मुक्ती मिळेल.

तूळ : आज प्रवास, नोकरी आणि गुंतवणूक अनुकूल लाभ देईल. भेटवस्तू इत्यादी प्राप्त होतील. काही मोठे काम झाले तर आनंद होईल. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाजूने सुखद परिस्थिती राहील. परिश्रमाच्या प्रमाणात नफा जास्त होईल.

वृश्चिक : आज तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. अनपेक्षित मोठे खर्च समोर येतील. तुम्हाला कर्ज घ्यावे लागेल, जोखीम घेऊ नका. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. पोटाचे विकार जडल्याने खाण्यापिण्यावर संयम ठेवा. वादापासून दूर राहावे. आर्थिक प्रगतीत अडथळा येऊ शकतो.

धनु : आज नवीन योजना बनतील. काही नवीन करार होतील. लाभाच्या संधी वाढतील. कामाच्या ठिकाणी बदल घडू शकतात. कौटुंबिक समस्या चिंतेचा असेल. अनुकूल वेळेचा फायदा जास्तीत-जास्त घ्यावा. नवीन यश मिळण्याची शक्यता आहे. व्यापार-व्यवसाय चांगला चालेल.

मकर : नवीन करारांचा लाभ मिळेल. पैसे मिळणे सोपे होईल. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. जोखीम घेऊ नका. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. चातुर्य, कार्यकुशलता आणि सहनशीलतेच्या बळावर येणारे अडथळे दूर होतील.

कुंभ : तुमची कोर्ट-कचेरीची उर्वरित कामे होतील. तुमचा व्यवसाय चांगला चालेल. तंत्र-मंत्रात रुची राहील. काहीही झाले तरी आळशी होऊ नका मुलांच्या कृतीने समाजात प्रतिष्ठा वाढेल. नेतृत्वगुणांना महत्त्व असल्याने प्रशासन आणि नेतृत्वाशी संबंधित कामात यश मिळेल.

मीन : आज वाहने आणि यंत्रसामग्री वापरताना काळजी घ्या. इतरांचा जामीन घेऊ नका. मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा. कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. व्यवसायात नवीन योजनांतून लाभ होण्याची शक्यता आहे. कायमस्वरूपी मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.