Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

LIC Policy : एलआयसी पॉलिसी बंद करायचीय? अगोदर 2 नियम माहित करुन घ्या.

0

LIC Policy : एलआयसीच्या माध्यमातून अनेक लोकांना बचतीचा सवय लागल्याचे बोलले जाते. यानिमित्ताने काही रक्कम बाजूला पडते. जी अडचणीच्या काळात उपयोगी पडते. तसे तर बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, मात्र LIC ची विश्वासार्हता उजवी ठरते. जर तुम्हीही एलआयसी पॉलिसी केली असेल आणि काही कारणास्तव ती सरेंडर करायची असेल, तर आधी त्याबाबतचे नियम आणि कायदे माहिती असायला हवे. एलआयसी पॉलिसी (LIC Policy) मध्येच बंद करणे याला पॉलिसी सरेंडर करणे असे म्हटले जाते. माहितीनुसार तुम्ही किमान 3 वर्षानंतरच LIC पॉलिसी सरेंडर करू शकता. जर तुम्ही 3 वर्षापूर्वी केले तर तुम्हाला पैसे मिळत नाहीत.

हेही वाचा : Stock Market : तरुणांनी स्टॉक मार्केट का शिकावे?

LIC Policy : सरेंडरचे नियम आहेत तरी काय?

पॉलिसी सरेंडर केल्यावर, तुम्हाला एलआयसीच्या नियमांवर आधारित सरेंडर व्हॅल्यू मिळते. म्हणजेच जर तुम्ही पॉलिसी बंद करण्याचा किंवा LIC मधून पैसे काढण्याचा निर्णय घेतला, तर तुम्हाला त्याच्या किमतीएवढी रक्कम परत मिळते, ज्याला सरेंडर व्हॅल्यू म्हटले जाते. जर तुम्ही संपूर्ण तीन वर्षांसाठी एलआयसीचा प्रीमियम भरला असेल, तरच तुम्हाला सरेंडर व्हॅल्यू मिळते.

LIC Policy : नक्की किती पैसे मिळतात?

असे बोलले जाते की, पॉलिसी सरेंडर केल्याने ग्राहकांना खूप तोटा सहन करावा लागतो. कारण पॉलिसी मॅच्युरिटीपूर्वी सरेंडर केल्याने मूल्य कमी होते. समजा तुम्ही 3 वर्षांसाठी प्रीमियम भरला असेल तर तुम्ही सरेंडर व्हॅल्यूसाठी पात्र आहात. त्यानंतर तुम्हाला भरलेल्या प्रीमियमच्या फक्त 30टक्के मिळेल परंतु पहिल्या वर्षाचा प्रीमियम मिळणार नाही. म्हणजे पहिल्या वर्षी तुम्ही भरलेले प्रीमियम पैसेही झिरो होतात.

पॉलिसी सरेंडर करण्यासाठी, LIC सरेंडर फॉर्म नंबर 5074 आणि NEFT फॉर्म आवश्यक आहे. यासोबत, तुम्हाला तुमच्या पॅन कार्डची एक कॉपी आणि पॉलिसीच्या मूळ कागदपत्र द्यावी लागेल. तुम्ही पॉलिसी का सोडत आहात? हे हाताने लिहिलेले पत्र देखील लागते.

Leave A Reply

Your email address will not be published.