तुमचा फोन नंबर चालू ठेवण्यासाठी तुम्ही जर परवडणाऱ्या प्लॅनच्या शोधात असाल तर तर तुम्ही 100 रुपयांपेक्षा कमीवाला रिचार्ज करू शकता. आज आम्ही तुमच्यासाठी देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपन्या Airtel, Vodafone-Idea, Reliance Jio आणि BSNL यांचे स्वस्त रिचार्ज प्लॅन घेऊन आलो आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया…
हे वाचा: 4 एप्रिल 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…
एअरटेल : या कंपनीने आपल्या ग्राहकांना 99 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन ऑफर केला आहे. 28 दिवसांची वैधता असलेला हा प्लॅन 99 रुपयांच्या टॉकटाईमसह येतो. यामध्ये 200MB डेटा दिला जातो. जर तुम्हाला सुमारे तीन महिन्यांची वैधता असलेला प्लॅन हवा असेल, तर एअरटेलने 455 रुपयांचा स्वस्त प्लॅन ऑफर केला आहे. यामध्ये, 84 दिवसांच्या वैधतेसह, दररोज 100 एसएमएस, 6 जीबी डेटा आणि अमर्यादित कॉलिंग सुविधा देखील उपलब्ध आहे.
जिओ : या कंपनीने सर्वात स्वस्त प्लॅन 26 रुपयांचा ऑफर केला आहे, जो 28 दिवसांच्या वैधतेचा आहे. यामध्ये 2 जीबी डेटाची सुविधा उपलब्ध आहे. 28 दिवसांच्या वैधतेसह, 62 रुपयांचा प्लॅन देखील येतो ज्यामध्ये 6 GB डेटा उपलब्ध आहे. मात्र यासोब कॉलिंग किंवा एसएमएसचा कोणताही फायदा मिळत नाही.
Vi : या कंपनीने 98 रुपयांचा स्वस्त प्लॅन ऑफर केला आहे जो 200MB डेटा आणि 15 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग ऑफर करतो. यामध्ये एसएमएसचा लाभ समाविष्ट नाही. याशिवाय 99 रुपयांचा प्लॅन आहे, ज्याची वैधता 28 दिवस आहे. यामध्ये 99 रुपयांचा टॉकटाईम आणि 200MB डेटा मिळतो.
हे वाचा: ICC Player of The Month : भारताचा तडाखेबाज बॅट्समन शुभमन गिल ठरला "आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ."
BSNL : या कंपनीकडून 49 रुपयांचा स्वस्त प्लॅन ऑफर करण्यात आला आहे. त्याची वैधता 20 दिवसांची आहे. यामध्ये 100 मिनिटे व्हॉईस कॉलिंग आणि 2 जीबी डेटा सुविधेचा समावेश आहे. याशिवाय 87 रुपयांचा प्लॅन आहे ज्यामध्ये 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. त्याची वैधता 14 दिवसांपर्यंत आहे, जी दररोज 100 एसएमएस सुविधेसह येते.