मेष : अधिक धावपळ असेल. आज एखादी वाईट बातमी मिळू शकते. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्या सभोवतालचे वाईट लोक नुकसान करू शकतात. तुम्ही केलेल्याच्य कृतीची समाजात टीका होईल. आज तुम्हाला राजकीय सहकार्य मिळेल. काहीही झाले तरी तुमच्या वाणीवर संयम ठेवा.
वृषभ : तुम्ही केलेल्या मेहनतीला आज यश मिळेल. तसेच तुमच्या कामाचे कौतुक होईल. अनेक लाभाच्या संधी हाती येतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. व्यवसाय चांगला चालेल. कामाचा निर्णय शांतपणे विचार करून घेणे तुमच्यासाठी शुभ राहील.
हे वाचा: Graphic Designer : ग्राफिक डिझाईनर आहात? 'या' नोकऱ्या करा मिळेल लाखांचे पॅकेज
मिथुन : आज तुम्हाला जुने मित्र आणि नातेवाईक भेटतील. आज उत्साहवर्धक माहिती मिळेल. नोकरीत इच्छित पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. काहीही झाले तरी तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमचे दुसऱ्याकडे अडकलेले पैसे परत मिळतील. व्यवसायात नवीन करार होतील. अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका.
कर्क : आजचा दिवस प्रवास, गुंतवणूक आणि नोकरीसाठी अनुकूल राहील. तुम्हाला अनपेक्षित लाभ होऊ शकतो. काहीही झाले तरी आज जोखीम घेऊ नका. आनंद होईल, अशा गोष्टी घडतील. आज धार्मिक कार्यात रस घेतल्याने तुमचे मनोबल उंचावेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.
सिंह : आज तुमच्याकडून अनावश्यक खर्च होईल. शारीरिक त्रास संभवण्याची शक्यता आहे. इतरांवर जास्त विश्वास ठेवू नका. तुमचा मनमिळावूपणा आणि सहनशील स्वभाव तुमच्या आयुष्यात आनंद आणेल. स्थिर संपत्ती वाढेल. व्यवसाय चांगला चालेल.
हे वाचा: Governors in Danger of Losing Their Jobs With Two Weeks
कन्या : तुमची बुडीत रक्कम प्राप्त होईल. व्यवसाय चांगला चालेल. तुमचा व्यावसायिक प्रवास यशस्वी होईल. आनंद मिळेल, अशा घटना घडतील. सार्वजनिक कामात वेळ जाईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. नोकरीच्या क्षेत्रात प्रगती होईल.