Wednesday , 29 May 2024
Home Uncategorized India Post Recruitment 2023 : आता दहावी पास असलात तरीही मिळेल सरकारी नोकरी; अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस.
Uncategorized

India Post Recruitment 2023 : आता दहावी पास असलात तरीही मिळेल सरकारी नोकरी; अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस.

India Post Recruitment 2023 : कोरोना काळानंतर अनेक यंत्रणांची अर्थव्यवस्था डबघाईला आली. बहुतांश कंपन्यांनी तर आपल्या कर्मचाऱ्यांना नारळ पण दिला. अनेकांची आर्थिक घडी विसकटली. आता या कठीण काळानंतर भारतीय डाक विभागाने रखडलेल्या नोकरभरतीचे परिपत्रक पुन्हा नव्याने जारी केलं आहे. भारतीय डाक विभागाने जारी केलेल्या जाहिरातीनुसार दहावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील भारतीय डाक विभागामध्ये नोकरी करण्यासाठी अर्ज करण्यात येणार आहे.

भारतीय डाक विभागाच्या या भरतीप्रक्रियेमध्ये जागांचा तपशील काय आहे, म्हणजे कोणत्या पदांसाठी व किती जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे तसेच या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी पात्रता काय? ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घेऊयात याबाबतची संपूर्ण माहिती.

हे वाचा: TATA WPL 2023 : आजपासून वुमेन्स IPL'ची होणार सुरुवात; सामने कधी आणि कुठे पाहता येणार येणार? पाहा.

पदांचे नाव आणि तपशील :

भारतीय डाक विभागात ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि डाक सेवक या रिक्त पदांची भरती होणार आहे. तसेच या भरती प्रक्रियेमार्फत तब्बल 40 हजार 889 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता :

भारतीय डाक विभागात नोकरी करण्याकरिता प्राथमिक शिक्षण हे दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. यासोबतच मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र म्हणजेच MSCIT हा राज्यसरकार पुरस्कृत कोर्स पूर्ण असणे गरजेचं आहे.

वयाची अट :

भारतीय डाकच्या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 16 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 40 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच SC आणि ST या प्रवर्गाच्या उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट देण्यात आली आहे तर OBC या प्रवर्गासाठी 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

हे वाचा: The Most Important Amicus Brief in the History of the World

परीक्षा शुल्क :

भारतीय डाक विभागाच्या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी अर्ज करताना जनरल, OBC आणि EWS या प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहे तर SC, ST, PWD आणि महिला यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नसणार.

अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट : डाक विभागाची अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

जाहिरात (Notification) : डाक विभागाच्या नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.

हे वाचा: फेब्रुवारीत किती दिवस बँका बंद राहतील? सुट्ट्यांची यादी तपासा..

ऑनलाईन अर्ज : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :

भारतीय डाक विभागातील भरती प्रक्रियेत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत असणार आहे. तर अर्ज अर्ज संपादित (Edit) करण्यासाठी 17 ते 19 फेब्रुवारी 2023 वेळ देण्यात आला आहे.Subscribe Now

  Subscribe to our mailing list to receives daily updates direct to your inbox!

  Related Articles

  SSC GD Constable Recruitment 2024
  Uncategorized

  SSC GD Constable Recruitment 2024 : SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26 हजार 146 जागांसाठी मेगा भरती सुरु; असा करा अर्ज

  SSC GD Constable Recruitment 2024 : तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी...

  G20-SUMMIT-2023
  Uncategorized

  G20 Summit 2023 : G20 परिषद

  G20 Summit 2023 – आजपासून दिल्लीत G20 परिषद सुरु झाली. कोण कोणते...

  Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana
  Uncategorized

  Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना.

  Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana ; पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना...

  AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.
  Uncategorized

  AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.

  AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु. पशुसंवर्धन...