ESIC योजनेत मोफत उपचार, कुटुंब निवृत्ती वेतनापर्यंत सर्व काही..
विशेषतः ज्या कर्मचाऱ्यांचे उत्पन्न कमी आहे अशा कर्मचाऱ्यांसाठी एक खास योजना सरकारने सुरु केली आहे. या योजनेच्या लाभार्था कर्मचाऱ्यांना ईएसआय कार्ड दिले जाते. ही एक योजना कर्मचारी राज्य विमा महामंडळ ESIC योजनेच्या नावाने आहे.
हे वाचा: 17 फेब्रुवारी 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…
कर्मचारी ईएसआय कार्ड कार्डच्या मदतीने ईएसआय दवाखाना किंवा रुग्णालयात मोफत उपचार घेऊ शकतात. आजघडीला ESIC ची देशभरात 150 हून अधिक रुग्णालये आहेत, जिथे सामान्य ते गंभीर आजारांवर उपचार केले जातात. याशिवाय इतरही काही सुविधा त्याअंतर्गत दिल्या जातात. या अंतर्गत कोणत्या प्रकारचे फायदे दिले जातात आणि कोणते कर्मचारी या अंतर्गत पात्र आहेत? त्याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात.
नक्की कोण पात्र आहे? : ज्या कर्मचाऱ्यांचे मासिक उत्पन्न 21 हजार रुपये किंवा त्याहून कमी आहे, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्याच वेळी, दिव्यांग व्यक्तींसाठी किमान वेतन मर्यादा 25 हजार रुपये एवढी आहे. याशिवाय, विमा लाभांसाठी कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांच्या वतीने ESI योजनेत योगदान दिले जाते. कर्मचार्यांच्या पगारातून 1.75 टक्के आणि 4.75 टक्के योगदान देण्याचा नियम आहे.
ESIC योजनेंतर्गत कोणते-कोणते फायदे मिळतात? :
हे वाचा: I Turned My Home Into a Fortress of Surveillance
- याअंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत उपचाराची सुविधा दिली जाते. तसेच कुटुंबांना मोफत उपचारही मिळतात.
- सेवानिवृत्त कर्मचारी आणि अपंगत्व असल्यास, व्यक्ती आणि त्यांच्या पत्नीला अवघ्या 120 रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर वैद्यकीय सुविधा मिळते.
- आजारी रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना 91 दिवसांसाठी रोख रक्कम दिली जाते. या दरम्यान, पगाराच्या 70 टक्के दराने रक्कम दिली जाते.
- ESI द्वारे प्रसूती रजा देखील दिली जाते, ज्यामध्ये प्रसूतीच्या 26 आठवड्यांपर्यंत महिलांना 100 टक्के पगार दिला जातो.
- जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर कुटुंबाला ESIC कडून 10 हजार रुपये दिले जातात आणि पेन्शनचा लाभ आई-वडील, पत्नी आणि मुलांना दिला जातो.