Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Unseasonal Rain : उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच राज्यात गडगडाटासह पावसाची शक्यता.

0

Unseasonal Rain : हवामान बदलाचा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. मागील फेब्रुवारी महिना हा जवळपास 100 वर्षातला सर्वात गरम आणि उष्ण महिना ठरला आहे. तसेच मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात सरासरी पेक्षा जास्त तापमान राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. यातच हवामान खात्याने राज्यात तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात उन्हाळा सुरु होण्याआधीच पाऊसाची हजेरी लावण्याची शक्यता आहे.

कधी आणि कुठे पडणार पाऊस?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील काही भागांत 4 ते 8 मार्च दरम्यान पाऊस पडणार आहे. राज्यात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी, उत्तर कोकण आणि विदर्भात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

‘या’ जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज –

5 ते 8 मार्च दरम्यान महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव ठाणे नाशिक, पालघर, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, बुलढाणा, जालना, अमरावती, मुंबई, वाशीम, यवतमाळ, वर्धा कोकणचा काही भाग आणि संपूर्ण विदर्भ या सर्व ठिकाणी तुरळक पाऊसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊसाची शक्यता आहे. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला हवामान खात्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली –

रब्बी हंगामातील शेतकऱ्याचं शेतातील पीक सध्या काढणीला आलं आहे त्यामुळे हवामान खात्याने वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आधीच शेतमालाला बाजारभाव कमी असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे त्यात आता हातातोंडाशी आलेला घास पण पाऊस हिरावून घेतो की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.