JOB UPDATE : दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी करण्याची संधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत MTS आणि हवालदार पदांच्या तब्बल 12 हजार 523 जागांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी पात्रता केवळ दहावी पास असणार आहे. ज्या उमेदवारांना या भरतीमध्ये भाग घ्यायचा आहे असे इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या माहितीच्या आधारे या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी अर्ज करू शकतात.

JOB UPDATE : पदांचे नाव आणि तपशील –
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) या पदांच्या 11 हजार 994 जागा भरल्या जाणार आहेत तर हवालदार (CBIC आणि CBN) या पदांच्या 529 जागा भरल्या जाणार आहेत.
हे वाचा: IPL 2023 Timetable : IPL 2023 चे संपूर्ण वेळापत्रक अन् फॉरमॅट एका क्लिकवर…
JOB UPDATE : शैक्षणिक पात्रता –
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत भरल्या जाणाऱ्या दोनही पदांच्या जागांसाठी हावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
JOB UPDATE : वयाची अट –
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2023 रोजी 18 ते 27 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच SC आणि ST या प्रवर्गाच्या उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट देण्यात आली आहे तर OBC या प्रवर्गासाठी 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
JOB UPDATE : परीक्षा शुल्क –
अर्ज करताना जनरल, OBC आणि EWS या प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहे तर SC, ST, PWD आणि महिला यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नसणार.
हे वाचा: 'ब्लूटूथ' हे नाव नक्की कसे पडले? जाणून घ्या रंजक कहाणी…
JOB UPDATE : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.
ऑनलाईन अर्ज – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
हे वाचा: You Can Read Any of These Short Novels in a Weekend
JOB UPDATE : महत्वाच्या तारखा :
वरील भरती प्रक्रियेत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत असणार आहे. तर परीक्षा एप्रिल 2023 मध्ये होणार आहे.