Threads App on Treading : ट्विटर सारख्या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला टक्कर देण्यासाठी मेटाने (Meta) एक App लॉन्च केलं आहे. मेटाच्या या नवीन ॲपला (What is Threads App?) “ट्विटर किलर” ॲप देखील म्हटलं जात आहे. कारण गुरुवारी म्हणजेच काल 6 जुलै 2023 रोजी हे ॲप लाँच केल्यापासून केवळ 24 तासामध्ये 50 मिलियन पेक्षा अधिक लोकांनी हे ॲप डाउनलोड केलं आहे. तसेच हे ॲप काही देशांच्या कठोर गोपनीय कायद्यांमुळे प्रत्येक देशात उपलब्ध नाहीये. तरी देखील नंबर 1 ट्रेंडिंगवर येणारं बहुदा हे पहिलंच ॲप असेल.

Threads App on Treading
हे ॲप अनेक देशांमध्ये ॲप स्टोअरमध्ये अव्वल स्थानी पोहोचले आहे. भारतात आयओएस वरील Top फ्री ॲप्स मध्ये थ्रेड्स आहेत, त्यानंतर व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामचा क्रमांक लागतो. थ्रेड्स ॲप चीनमधील ॲप स्टोअरमध्ये पाचव्या स्थानावर पोहोचले आहे, जिथे मेटाचे (Meta) इतर ॲप्स सध्या ब्लॉक आहेत. तसेच काही युरोपीय देशांमध्येही Threads App ॲप स्टोअरवरती ट्रेंडिंग वरती आहे.
हे वाचा: Amazing Veg Soups for Monsoon Season : मुसळधार पावसाळी हंगामासाठी भन्नाट अशी व्हेज सूप्स
हेही वाचा : मध्यम मुदतीसाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना; जाणून घ्या
What is Threads App? : हे Threads App आहे तरी काय आहे?
थ्रेड्स हे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप या मूळ कंपनीचे नवे ॲप आहे. प्लॅटफॉर्म ट्विटरसारखा दिसतो, ज्यात ट्विटरपेक्षा मोठ्या प्रमाणात मजकूर-आधारित पोस्टचा फीड आहे. यातवापरकर्ते फोटो आणि व्हिडिओ देखील पोस्ट करू शकतात. तसेच लोक रिअल-टाइम संभाषण देखीलकरू शकतात.
मेटाने सांगितले की थ्रेड्सवर पोस्ट केलेल्या संदेशांना 500 अक्षरांची मर्यादा असेल. ट्विटरप्रमाणेच, वापरकर्ते इतरांच्या थ्रेड पोस्टला उत्तर देऊ शकतात, पुन्हा पोस्ट करू शकतात. तसेच हे ॲप इंस्टाग्रामशी लिंक करता येते. त्यामुळे तुमचा सगळं डेटा Threads App वर सिंक होतो. ह्यामुळे थ्रेड्सवरून थेट इन्स्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट एकत्रित करू शकता.
हे वाचा: Red Banana : लाल केळी - महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा अभिनव उपक्रम.
Threads App on Treading : ट्विटरची मेटाला धमकी
द वर्जने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारपर्यंत थ्रेड्स ॲपवर 95 मिलियनपेक्षा अधिक पोस्ट होत्या आणि प्लॅटफॉर्म वर एकूण 190 मिलियन लाइक्स मिळाले होते.या सर्व गोष्टींचा एलॉन मस्क यांच्या ट्विटरला त्रास झाला असून ट्विटरचे वकील ॲलेक्स स्पिर्ट यांनी मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना पाठवलेल्या पत्रात या प्लॅटफॉर्मने मेटाला कायदेशीर कारवाईची धमकी दिली आहे.
Threads App on Treading : मिम्सचा वर्षाव
थ्रेडस ॲप लाँच झाल्यापासून मिम्सचा प्रत्येक शोषलं मीडिया प्लॅटफार्मवरती मिम्सचा पाऊस पडत आहे. काहींना थ्रेडस ॲप खूप आवडलं आहे तर काहींना हे ॲप वापरताना थोड्याच वेळात बोर झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर काहींनी ट्विटर या ॲपकडे पुन्हा जाण्याचा निर्णय घेतला आहे.
View this post on Instagram