WhatsApp screen share update : इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने व्हिडिओ कॉल चालू असताना वापरता येतील असे दोन नवीन फीचर्स आणले आहेत. यामध्ये स्क्रीन शेअरिंग आणि लँडस्केप मोड ह्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. स्क्रीन शेअरिंग ह्या वैशिष्ट्यासह, व्हिडिओ कॉलिंग दरम्यान युझर्स त्यांच्या हॅण्डसेटची स्क्रीन इतर युझर्ससोबत शेअर करू शकतील.

हे वैशिष्ट्य युझर्सना त्याच्या कॉन्टॅक्टमधील लोकांना कागदपत्रे, फोटो आणि शॉपिंग कार्ट व्हिडिओ कॉल मध्ये शेअर करण्यासाठी सुविधा देते. सदरील व्हिडिओ कॉल आता लँडस्केप मोडवरपण ठेवता येईल. आता झूम, गुगलमीट, फेसटाईम अश्या App सोबत WhatsApp स्पर्धा करेल.
हे वाचा: Top 5 Trending Smartphones : गेल्या 2 महिन्यांतील भारतातील टॉप ट्रेंडिंग फोन
WhatsApp screen share update Information : झुकेरबर्ग यांनी उपडेट बद्दल दिली माहिती
मेटा जी व्हॉट्सॲपची मूळ कंपनी आहे त्याच्या सीईओने म्हणजे झुकेरबर्गने फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ह्या अपडेटबद्दल माहिती दिली.

हेही वाचा : Best Health Insurance Company : भारतातली सध्याची सर्वात लाडकी हेल्थ इन्शुरन्स कंपनी.
‘आम्ही व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल दरम्यान तुमची स्क्रीन शेअर करण्याची सुविधा ऍड करीत आहोत.’ अशी पोस्ट मार्क ने फेसबुकवर टाकली हा आहे. मार्कने पोस्टसोबत एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे, ज्यामध्ये तो व्हिडिओ कॉल करताना दिसतो.
हे वाचा: Which Fridge should you Buy? : फ्रिज घेताय? कोणता फ्रिज घ्यावा?
WhatsApp screen share update : अजून ही काही नवीन फीचर्स येत आहेत – Upcoming WhatsApp Features
तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये असाल तर तुमचा फोन नंबर तुम्ही हाईड करून ठेवू शकाल. तो नम्बर व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये दिसणार नाही. ‘फोन नंबर प्रायव्हसी’ फीचर लवकरच उपलब्ध असेही कम्पनीने सांगितले आहे. तसेच व्हिडिओ मेसेज पण तुम्ही पाठवू शकाल. हे व्हिडिओ ६० सेकंदापर्यंतचे असू शकतील.