What is Metaverse? : मेटाव्हर्स हा आताशा परवलीचा शब्द झालेला आहे. म्हणजे हा शब्द माहित नाही असा एकही तरुण / तरुणी सापडणार नाही.
अर्थात ह्या विषयाची डिटेल पूर्ण माहिती असेलच असं नाही. प्रत्येकाचे त्याचे त्याचे व्हर्जन्स असतील ह्या संकल्पनेविषयी.
हे वाचा: Swaraj Target 630 : ट्रॅक्टर घ्यायचाय? कमी किमतीतला हा टॅक्टर आहे सगळ्यात भारी.
What is Metaverse? : मेटाव्हर्स म्हणजे नेमकं काय?
मेटाव्हर्स ही एक संकल्पना आहे, जी भौतिक आणि आभासी वास्तविकतेच्या एकत्रीकरणाने तयार केलेली आहे.
एक आभासी पण खरी वाटू शकेल अश्या प्रकारे मांडणी केलेला फील देणारी गोष्ट म्हणजे मेटाव्हर्स.
मेटाव्हर्स हे एक असं डिजिटल वातावरण तयार करतं, जिथं लोकं एकमेकांशी रिअल-टाइममध्ये आभासी वस्तूंसह संवाद साधतात.
हे वाचा: Online Betting Sites : ऑनलाइन सट्टेबाजी साइट आणि साधक-बाधक माहिती.
मेटाव्हर्स जवळपास सर्वांना अवगत :
मेटाव्हर्स तसे पाहायला गेलं तर आज तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्यक्षात उतरले आहे, पण ही संकल्पना अनेक दशकांपासून अस्तित्वात आहे.
विज्ञानातल्या कथा, साहित्य आणि चित्रपटांमध्ये ह्यापूर्वीच लोकप्रिय झाली असल्याने त्याचा प्रभाव पडायला मदत पटकन झाली आहे.
(Virtual Reality) व्हर्च्युअल रिऍलिटी, (AR) ऑगमेंटेड रियालिटी, (Block-chain) ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि (AI) कृत्रिम बुद्धिमत्ता ह्या विषयातील गेल्या काही वर्षातील प्रगतीने मेटाव्हर्सची कल्पना अगदी वास्तवाच्या जवळ आली आहे.
हे वाचा: Threads App on Treading : जिकडे-तिकडे फक्त Threads ॲपची चर्चा; काय आहे हे Threads App?
मेटाव्हर्समध्ये, आजकाल युझर्स अवतार तयार करू शकतात. म्हणजे स्वतःची अशी प्रतिमा जी डिजिटली स्वतःला रिप्रेझेंट करू शकेल.
भिन्न आभासी वातावरण त्या स्वतःला म्हणजे स्वतःच्या डिजिटल अवताराला एक्सप्लोर करतात. ते इतर युझर्स सोबत संवाद साधतात.
गेमिंग, शॉपिंग, एखाद्या महत्वाच्या कार्यक्रमांना डिजिटली उपस्थित राहणे, ह्याचबरोबर आभासी कार्यालयांमध्ये काम करणे अश्या गोष्टी आजकाल युझर्स ह्या मेटाव्हर्समध्ये कार्याला लागले आहेत.
मेटाव्हर्समुळे क्रांती घडू शकते?
मेटाव्हर्स संकल्पनेत सध्याच्या आपल्या जगण्याच्या, कामाच्या आणि समाजीकरणाच्या पद्धतीमध्ये म्हणजे डेली रुटीनमध्ये क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे.
मेटाव्हर्स व्यवसायांना नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी, आणि दूरवरच्या एम्प्लॉयी सोबत कनेक्ट करण्यासाठी मदत करते आहे.
सध्याच्या काळात मनोरंजन आणि शिक्षणाचे नवीन प्रकार मेटाव्हर्समुळे तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भविष्यात सामाजिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणसाठी मेटाव्हर्स हे एक महत्वाचे व्यासपीठ प्रदान करू शकते.
मेटाव्हर्समुळे काही आव्हाने निर्माण होणार?
पण एक भीती पण निर्माण झाली आहे. मेटाव्हर्स जसजसे विकसित होत चालले आहे त्यामुळे नैतिक, कायदेशीर आणि तांत्रिक आव्हाने निर्माण होत आहेत.
ह्या सगळ्या आव्हानात सिक्रसी, सेक्युरिटी, मालकी, आयडेंटिटी आणि महत्वाचं म्हणजे शासनाशी संबंधित अनके बाबींचा समावेश आहे.
म्हणूनच त्यांवर कुठल्यातरी माध्यमातून नियंत्रण हवे आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी उपयोग होणे जास्त फायदेशीर आहे. पण विघातक गोष्टींना आला घालण्यासाठी सकारात्मक मानसिकतेचे मेटाव्हर्स युझर्स तयार होणे आवश्यक आहे. आपण मिळून ह्या बदलास सामोरे जाऊयात. बदल घडवण्याच्या प्रक्रियेत आपलाही सहभाग नोंदवुयात.