India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रोलिया (India vs Australia) यांच्यात सध्या कसोटी मालिका म्हणजेच बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (BGT) सुरु आहे. या कसोटी मालिकेत 4 सामने खेळवले जाणार असून भारतीय संघाने झालेले दोन्ही कसोटी सामने जिंकून मालिकेत एकहाती वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. आता बीसीसीआय (BCCI) कडून उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी आणि कसोटी मालिका झाल्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी (India vs Australia ODI Series) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही संघात काहीअंशी बदलावं करण्यात आले आहेत.
उर्वरित कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा –
बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या (BGT) उर्वरित दोन सामन्यांसाठी बीसीसीआयने (BCCI) काल भारतीय संघ घोषित केला आहे. या संघामध्ये एक मोठा बदलावं झाला आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार लोकेश राहुल यांची कर्णधार पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर रोहित शर्मा कर्णधार पदावर कायम आहे. संघ घोषित करताना उपकर्णधार कोण असणार याची अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. यासोबतच जयदेव उनाडकट संघात परतला आहे. जयदेव उनाडकट हा सौराष्ट्र या संघाचा कर्णधार आहे, त्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यात होणाऱ्या फायनल सामन्यासाठी रिलीज करण्यात आलं होत. आता तो संघात परतला आहे. तसेच उर्वरित संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
अखेरच्या दोन सामन्यासाठी कोण कोण संघात?
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर , सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनादकट.
IPL 2023 Timetable : IPL 2023 चे संपूर्ण वेळापत्रक अन् फॉरमॅट एका क्लिकवर…
…म्हणून के एल राहुलची उपकर्णधार पदावरून हालपट्टी?
के एल राहुल भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. पण त्याची सध्याची कामगिरी खूपच खराब आहे. ऑस्ट्रेलिया दोन्ही कसोटी सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही म्हणून त्याची संघाच्या उपकर्णधार पदावरून हालपट्टी करण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे.
एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा –
कसोटी मालिका झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया सोबत 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका (India vs Australia ODI Series) होणार आहे. या एकदिवसीय मालिकेसाठी देखील बीसीसीआय (BCCI) कडून काल भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. जयदेव उनादकटचा तब्बल 10 वर्षांनी भारतीय एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे तर रवींद्र जाडेजा देखील एकदिवसीय संघात परतला आहे. तसेच पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताचा कर्णधार रोहित शर्मा उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या पहिला एकदिवसीय सामन्यांसाठी संघाचा कर्णधार असणार आहे.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, जयदेव उनादकट.
एकदिवसीय मालिका कधी सुरु होणार?
कसोटी मालिका संपल्यानंतर लगेचच एकदिवसीय मालिकेला (India vs Australia ODI Series) सुरुवात होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना 17 मार्चला मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे तर दुसरा सामना दुसरा एकदिवसीय सामना 19 मार्चला विशाखापट्टम येथे खेळवला जाईल तर तिसरा एकदिवसीय सामना 22 मार्चला चेन्नई येथे होणार आहे. या मालिकेनंतर 30 मार्चपासून आयपीएलला (IPL 2023) सुरुवात होणार आहे.
हे वाचा: Daily Horoscope: 15 फेब्रुवारी 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…