Thursday , 8 June 2023
Home Uncategorized Why marriage registration certificate is required? How to register? विवाह नोंदणी प्रमाणपत्र का आवश्यक? नोंदणी कशी कराल?
Uncategorized

Why marriage registration certificate is required? How to register? विवाह नोंदणी प्रमाणपत्र का आवश्यक? नोंदणी कशी कराल?

Why marriage registration certificate is required? How to register? : लग्नानंतर विवाह प्रमाणपत्र हे वधू आणि वराच्या वैवाहिक बंधनाचे कायदेशीर प्रमाणपत्र देणारे दस्तवेज आहे. बहुतांशी सरकारी कामकाजात या प्रमाणपत्र गरज लागतेच. मात्र, बहुतांशी जोडपे लग्न केल्यानंतर महापालिका, नगरपरिषद अथवा ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी करून विवाह प्रमाणपत्र घेत नाहीत. नंतर काही कामास्तव गरज भासल्यानंतर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धावपळ केली जाते. चला, तर विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे लागतात? नोंदणी कशी करायची? या लेखामध्ये जाणून घेऊयात…

नोंदणीनंतर 3 ते 4 दिवसांत प्रमाणपत्र : विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी महापालिकेत अर्ज केल्यानंतर आणि आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसांत हे प्रमाणपत्र मिळते. यासाठी वधू व वराचा शाळा सोडल्याचा दाखला व रेशनकार्ड, वधू व वराचा लग्नाचा फोटो व लग्नपत्रिका, 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र, 110 रुपयांची स्टॅम्प तिकिटे, तीन साक्षीदार व पुरोहिताच्या रेशनकार्डची झेरॉक्स, घरपट्टी किंवा नगरसेवकाचे ओळखपत्र आदी कागदपत्रे लागतात.

हे वाचा: पेटीएम अँप डाउनलोड करून महिन्याला १०-२० हजार रुपये कमवा

प्रमाणपत्र आवश्यक का? : या प्रमाणपत्राला कायदेशीर अधिकृत कागदपत्र म्हणून मान्यता आहे. यामुळे बालविवाहांवर आळा घालता येतो. हे प्रमाणपत्र विधवांना वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. द्विपत्नी व बहुपत्नीत्व विरुद्ध कायदेशीर हक्क लढता येतो. विभक्त कुटुंबात स्त्रियांना मुलांसाठी कायदेशीर हक्क लढता येतो. तसेच पासपोर्ट, बँकेचे कर्जप्रकरण, विम्यासाठी दावा आदी कामांसंदर्भात हे प्रमाणपत्र गरजेचे ठरते.

नोंदणी कशी कराल? : शहरातील रहिवासी असाल तर महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचाय येथे विवाह नोंदणी विभाग कार्यरत असतो. नोंदणीसाठी त्या ठिकाणी फॉर्म मिळतो. प्रथम हा फॉर्म भरून त्याला आवश्यक ती कागदपत्रे जोडा, मग त्यानंतर प्रमाणपत्र मिळते. गावाकडील रहिवासी असाल तर ग्रामपंचायत कार्यालयातूनही हे प्रमाणपत्र काढता येते.

हे वाचा: Mutual Funds Investment Planning : म्युच्युअल फंडात गुंतवणुकीपूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? समजून घ्या..

Related Articles

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.
Uncategorized

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु. पशुसंवर्धन...

Uncategorized

Job Update : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात विविध पदांसाठी भरती सुरु.

Job Update : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात जवळपास 5 हजार विविध...

Uncategorized

EV Market :EV चे मार्केट आहे फुल्ल जोरात

EV market : इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) बाजारपेठेत लक्षणीय वाढ होते आहे आणि...

मसालेदार मार्केट
Uncategorized

Spicy Market : मसालेदार मार्केट.

Spicy Market : भारतीय मसाल्यांचे मार्केट आता चांगलेच लोकप्रिय झालेले आहे. हा...