Tuesday , 30 May 2023
Home Uncategorized Aadhaar Card Update : फुकटात होणार आधार कार्ड अपडेट, मोठा निर्णय वाचा…
Uncategorized

Aadhaar Card Update : फुकटात होणार आधार कार्ड अपडेट, मोठा निर्णय वाचा…

Aadhaar Card Update : आधार कार्ड हे भारतीयांसाठी अतिशय महत्वाचे दस्तऐवज आहे. केंद्र सरकारने आधारबाबत एक महत्वाची सूचना केली होती. ज्यांनी 10 वर्षांपूर्वी आधार नोंदणी केली आणि त्यात एकदाही बदल केलेला नाही, त्यांनी आधारमधील माहिती अपडेट करण्यास सांगण्यात आले होते. आता याबाबत सरकारने एक दिलासा देखील दिला आहे.

आधारमधील माहिती आता मोफत अपडेट होणार आहे. मात्र यासाठी 14 जून 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. आधार प्राधिकरण अर्थात यूआयडीआयने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार 14 जूनपर्यंत आधार डॉक्युमेंट अपडेट करण्याची सुविधा मोफत असल्या कारणाने त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. हा बदल डिजिटल इंडिया मोहिमेंतर्गत करण्यात आला आहे. आधार 10 वर्षांपूर्वी काढले असून त्यात कधीही अपडेट केली नसल्यास ओळखपत्र आणि रहिवासाचा पुरावा अपलोड करणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला सरकारी लाभांपासून वंचित राहावे लागले.

हे वाचा: MPSC News : मोठी बातमी..! MPSCच्या विद्यार्थ्यांची मागणी मान्य.

जर विचार केला तर ‘आधार’ अपडेटसाठी अगोदर 50 रुपये शुल्क मोजावे लागत होते. मात्र, 10 वर्षांमध्ये एकदाही ‘आधार’ अपडेट झाले नसल्यास मोफत कागदपत्रे अपलोड करून अपडेट करता येईल. मात्र नाव, पत्ता किंवा जन्म तारखेत बदल करायचा असेल तर नियमित शुल्क द्यावे लागेल. मोफत ‘आधार’ अपडेटची सुविधा केवळ माय आधार पोर्टलवर आहे. तर ‘आधार’ केंद्रांवर 50 रुपये शुल्क द्यावे लागेल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

Related Articles

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.
Uncategorized

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु.

AHD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु. पशुसंवर्धन...

Uncategorized

Job Update : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात विविध पदांसाठी भरती सुरु.

Job Update : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात जवळपास 5 हजार विविध...

Uncategorized

EV Market :EV चे मार्केट आहे फुल्ल जोरात

EV market : इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) बाजारपेठेत लक्षणीय वाढ होते आहे आणि...

मसालेदार मार्केट
Uncategorized

Spicy Market : मसालेदार मार्केट.

Spicy Market : भारतीय मसाल्यांचे मार्केट आता चांगलेच लोकप्रिय झालेले आहे. हा...