Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

OTT:अवघ्या 599 रुपयांत जुन्या टीव्हीवर घ्या ओटीटीचा आनंद

0

नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची घाई करण्याची गरज नाही. कारण आता तुम्ही तुमच्या जुन्या टीव्हीवर ओटीटी प्लॅटफॉर्मचा आनंद घेऊ शकता, तेही 6 महिने मोफत. डिश टीव्ही, देशातील सर्वात मोठ्या डायरेक्ट-टू-होम (DTH) सेवा प्रदात्यांपैकी एक आहे. त्यांनी आपल्या ग्राहकांना डिश SMRT स्टिक नावाचे उत्पादन ऑफर केले आहे.

हे उत्पादन एक स्टिक आहे जी तुमच्या सेट-टॉप बॉक्सशी (STB) कनेक्ट केली जाऊ शकते. यामुळे तुम्हाला ओटीटी (ओव्हर-द-टॉप) प्लॅटफॉर्मवरील कंटेटमध्ये प्रवेश करता येणार आहे. या उत्पादनाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याची परवडणारी क्षमता आहे. ही स्टीक अतिशय वाजवी दरात उपलब्ध आहे. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात..

डिश स्मार्ट स्टिकची किंमत 599 रुपये युनिट आहे. या उत्पादनाची एमआरपी 999 रुपये आहे. पण, सध्या डिश टीव्ही ऑफर म्हणून 599 रुपयांना विकले जात आहे. प्रथमच वापरकर्त्यांना पहिल्या सहा महिन्यांसाठी स्मार्ट स्टिकसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. त्यानंतर, स्टिक वापरण्याची किंमत दरमहा 25 रुपये + कर असे असणार आहे. डिश स्मार्ट स्टिकसाठी कोणतेही इंस्टॉलेशन शुल्क नाही. कंपनी या उत्पादनासह सहा महिन्यांची वॉरंटी देखील देत ​​आहे.

डिश स्मार्ट स्टिक हे फक्त एक यूएसबी वाय-फाय डोंगल आहे, जे तुम्हाला ओटीटी अ‍ॅप्स आणि त्यांच्या कंटेटच्या जगात प्रवेश देण्यासाठी एसटीबीशी कनेक्ट केले जाऊ शकते. डिश टीव्हीने म्हटले आहे की, जर एखाद्या वापरकर्त्याला ही सेवा वापरायची असेल, तर त्याला डिश स्मार्ट स्टिकद्वारे कोणत्याही उपलब्ध वाय-फाय नेटवर्कशी किंवा मोबाईल हॉटस्पॉटशी त्याचा/तिचा Dish NXT HD STB कनेक्ट करणे आवश्यक आहे. स्मार्ट स्टिक एसटीबीच्या यूएसबी पोर्टशी जोडली जाऊ शकते.

Dish TV ने सुचवले आहे की डिश स्मार्ट स्टिकच्या सर्वोत्तम अनुभवासाठी वापरकर्त्यांकडे 4 Mbps किंवा त्याहून अधिक गतीचे इंटरनेट कनेक्शन असायला हवे. या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध अ‍ॅप्स मोफत असतीलच असे नाही. मात्र ZEE5, Doubly, o, हंगामा प्ले, AltBalaji Eros Now आणि इतर सारखे प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना डिश SMRT स्टिकसह उपलब्ध असतील.

Leave A Reply

Your email address will not be published.