T20 World Cup 2024 Timetable : भारत पाकिस्तान सामन्याचा थरार पुन्हा रंगणार आहे. यावर्षी जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिज इथे होणाऱ्या आयसीसी T20 क्रिकेट वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार भारत आणि पाकिस्तना पुन्हा एकमेकांच्या आमने सामने येणार आहेत. यंदाच्या T20 वर्डकपमध्ये एकूण 55 सामने खेवण्यात येणार आहे. कसा असणार आहे हा संपूर्ण T20 वर्ल्डकप? जाणून घेऊयात…
T20 World Cup 2024 Timetable : असा असेल T20 वर्ल्डकपचं वेळापत्रक
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच या सर्व संघांना 4 ग्रुप मध्ये विभागले आहे. भारताचा A ग्रुपमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
असे असतील ग्रुप
A ग्रुप – भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
B ग्रुप – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
हे वाचा: टीम इंडिया क्रिकेट वर्ल्ड कपसाठी रेडी - Cricket World Cup 2023 - Team India
C ग्रुप – न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
D ग्रुप – दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ
T20 World Cup 2024 Timetable : भारताचा वर्ल्डकप मधील प्रवास
भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. दुसरा सामना 9 जून रोजी पाकिस्तानशी होणार आहे. तर भारतीय संघ 12 जून रोजी अमेरिकेविरुद्ध तिसरा गट सामना खेळणार आहे. भारताचा शेवटचा गट सामना 15 जून रोजी कॅनडाविरुद्ध होणार आहे.
भारतीय संघाचे वेळापत्रक
5 जून – भारत वि आयर्लंड, न्यूयॉर्क
9 जून – भारत वि.पाकिस्तान, न्यूयॉर्क
12 जून – भारत वि अमेरिका, न्यूयॉर्क
15 जून – भारत वि.एस. कॅनडा, फ्लोरिडा
असा असेल T20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट :
आगामी T20 विश्वचषक 1 जून ते 29 जून दरम्यान होणार आहे. 20 संघांची ही स्पर्धा बाद फेरीसह एकूण 3 टप्प्यात खेळवली जाईल. सर्व 20 संघ प्रत्येकी 5 च्या 4 गटात विभागले जातील. प्रत्येक गटातील टॉप-2 संघ सुपर-8 मध्ये प्रवेश करतील. यानंतर, सर्व 8 संघ प्रत्येकी 4 च्या 2 गटात विभागले जातील. सुपर-8 टप्प्यात दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. दोन संघ उपांत्य फेरीच्या दोन सामन्यांद्वारे अंतिम फेरीत प्रवेश करतील.
T20 World Cup 2024 Timetable : वर्ल्ड कपचं संपूर्ण वेळापत्रक येथे पाहा