WPL Gujarat Giants Squad : इंडियन प्रीमिअर लीग (IPL) प्रमाणेच आता वूमन्स प्रीमियर लीगचा (Women’s Premier League) थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. वूमन्स आयपीएलच्या (WPL) पहिल्या सीझनमध्ये 5 फ्रँचायझींचे संघ असणार आहे. यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals), गुजरात जायंट्स (Gujarat Giants), मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि यूपी वॉरियर्सवूमन्स ( UP Warriors Women) या संघांचा समावेश आहे.
याच दरम्यान काल मुंबई येथे वूमन्स प्रीमियर लीगच्या (Women’s Premier League) पहिल्या सिझनसाठी काल पार पडलेल्या लिलावात गुजरात जायंट्स (Gujarat Giants) या संघाने तडफदार खेळाडूंना विकत घेऊन आपला संघ तगडा बनविला आहे. गुजरातच्या संघाने अनेक तगड्या विदेशी खेळाडूंवर बोली लावत त्यांना आपल्या संघात सामील करून घेतलं आहे. यात त्यांनी अॅशले गार्डनर (3.2 कोटी), बेथ मुनी (2.2 कोटी), सोफिया डंकले (60 लाख), ऍनाबेल सदरलँड (70 लाख) या विदेशी खळाडूंवर सर्वाधिक पैसे खर्च केले. तर गुजरातच्या फ्रँचायझीने कोणकोणते खेळाडू विकत घेतले? जाणून घ्या.
हे वाचा: Diwali Ank 2024: आकर्षक कथा आणि प्रेरणादायक लेखांचा संग्रह!
असा आहे गुजरातचा संघ –
गुजरात जायंट्स
अॅशले गार्डनर (3.2 कोटी), बेथ मुनी (2.2 कोटी), सोफिया डंकले (60 लाख), ऍनाबेल सदरलँड (70 लाख), हरलीन देओल (40 लाख), डिआंड्रा डॉटिन (60 लाख), स्नेह राणा (75 लाख), सब्बिनेनी मेघना 30 लाख), जॉर्जिया वेयरहम (75 लाख), मानसी जोशी (30 लाख), दयालन हेमलता (30 लाख), मोनिका पटेल (30 लाख), तनुजा कंवर (50 लाख), सुषमा वर्मा (60 लाख), हर्ले गाला (10 लाख), पारुनिका सिसोदिया (10 लाख), शबनम शकील (10 लाख), अश्वनी कुमारी (35 लाख)
प्रीमियर लीगच्या लिलावात प्रत्येक फ्रँचायझींना खेळाडू खरेदी करण्यासाठी 12 कोटी रुपयांचं बजेट देण्यात आलं होत. या बजेट मधून प्रत्येक फ्रँचायझीला कमीत कमी 15 खेळाडू आणि जास्तीत जास्त 18 खेळाडू खरेदी करावे लागणार होते.
हे वाचा: How to make your life routine more fun and eco-friendly
वूमन्स प्रीमियर लीगचा थरार कधी रंगणार?
बीसीसीआयने अधिकृतपणे दिलेल्या माहितीनुसार वूमन्स प्रीमियर लीगचा थरार येत्या 4 मार्च ते 26 मार्च 2023 या कालावधी दरम्यान रंगणार आहे. तसेच या लीगचे सर्व सामने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत, वूमन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या सिझनमध्ये एकूण 22 सामने खेळवले जाणार आहेत.