WPL Delhi Capitals Squad : वूमन्स प्रीमियर लीगचा लिलाव संपन्न; दिल्लीच्या संघाने कोणते खेळाडू घेतले विकत? पाहा.
WPL Delhi Capitals Squad : इंडियन प्रीमिअर लीग (IPL) प्रमाणेच आता वूमन्स प्रीमियर लीगचा (Women’s Premier League) थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. वूमन्स आयपीएलच्या (WPL) पहिल्या सीझनमध्ये 5 फ्रँचायझींचे संघ असणार आहे. यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals), गुजरात जायंट्स (Gujarat Giants), मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि यूपी वॉरियर्सवूमन्स ( UP Warriors Women) या संघांचा समावेश आहे.
याच दरम्यान काल मुंबई येथे वूमन्स प्रीमियर लीगच्या (Women’s Premier League) पहिल्या सिझनसाठी लिलाव पार पडला. कालच्या लिलावात स्टार खेळाडूंना विकत घेण्यासाठी सर्वच 5 संघांत चुरस पाहायला मिळाली. तसेच काल झालेल्या लिलावात दिल्लीच्या संघानेही चांगल्या खेळाडूंना आपल्या संघात सामील करून घेतलं आहे. दिल्लीच्या फ्रँचायझीने जेमिमाह रॉड्रिग्ज (2.2 कोटी)आणि शफाली वर्मा (2 कोटी) या दोन खेळाडूंवर सर्वाधिक बोली लावली. तर जाणून घेऊयात बंगलोरच्या फ्रँचायझीने कोणते खेळाडू विकत घेतले.

असा आहे दिल्ली कॅपिटल्सचा संघ –
दिल्ली कॅपिटल्स
जेमिमाह रॉड्रिग्ज (2.2 कोटी), मेग लॅनिंग (1.1 कोटी), शफाली वर्मा (2 कोटी), राधा यादव (40 लाख), शिखा पांडे (60 लाख), मारिझान कॅप (1.5 कोटी), तितास साधू (25 लाख), अॅलिस कॅप्सी (75 लाख), तारा नॉरिस (10 लाख), लॉरा हॅरिस (45 लाख), जसिया अख्तर (20 लाख), मिन्नू मणी (30 लाख), जेस जोनासेन (50 लाख), तानिया भाटिया (30 लाख), पूनम यादव (30 लाख), स्नेहा दीप्ती (30 लाख), अरुंधती रेड्डी (30 लाख), अपर्णा मंडल (10 लाख)
प्रीमियर लीगच्या लिलावात प्रत्येक फ्रँचायझींना खेळाडू खरेदी करण्यासाठी 12 कोटी रुपयांचं बजेट देण्यात आलं होत. या बजेट मधून प्रत्येक फ्रँचायझीला कमीत कमी 15 खेळाडू आणि जास्तीत जास्त 18 खेळाडू खरेदी करावे लागणार होते.
वूमन्स प्रीमियर लीगचा थरार कधी रंगणार?
बीसीसीआयने अधिकृतपणे दिलेल्या माहितीनुसार वूमन्स प्रीमियर लीगचा थरार येत्या 4 मार्च ते 26 मार्च 2023 या कालावधी दरम्यान रंगणार आहे. तसेच या लीगचे सर्व सामने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत, म्हणजेच मुंबईच्या संघाला होम ऍडव्हान्टेज मिळणार आहे. वूमन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या सिझनमध्ये एकूण 22 सामने खेळवले जाणार आहेत.