Thursday , 16 January 2025
Home घडामोडी UPSC Results 2022 : यूपीएससी 2022 परीक्षेचा निकाल जाहीर.
घडामोडी

UPSC Results 2022 : यूपीएससी 2022 परीक्षेचा निकाल जाहीर.

UPSC Results 2022 : Letstalk

UPSC Results 2022 : भारतातील सर्वात कठीण असणारी यूपीएससी (UPSC) 2022 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा या परीक्षेत मुलींनी बाजी मारली असून इशिता किशोर ही देशात पहिली आली आहे. तर गरिमा लोहिया ही देशातून दुसरी आणि उमा हरिथी ही विद्यार्थिनी देशातून तिसरी आली आहे. महाराष्ट्रात देखील अव्वल स्थानावर मुलींनी बाजी मारली आहे. ठाण्याची कश्मीरा संखे ही महाराष्ट्रातून पहिली आली आहे तर काश्मीरचा देशात 25 वा नंबर आला आहे.

परीक्षेत 933 विद्यार्थी उत्तीर्ण

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत एकूण 933 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात सामान्य (OPEN) गटातून 345 विद्यार्थी, आर्थिक मागास प्रवर्गातून (EWS) 99, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (OBC) 263, अनुसूचित जाती प्रवर्गातून (SC) 154, अनुसूचित जमाती प्रवर्गातून 72 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

हे वाचा: New Parliament Special Session : नवीन संसदेत विशेष अधिवेशन

UPSC Results 2022 : उत्तीर्ण झालेले टॉप 10 विद्यार्थी

इशिता किशोर

गरिमा लोहिया

उमा हरति एन

हे वाचा: Contract Recruitment : शासकीय पदांवर भरती

स्मृति मिश्रा

मयूर हजारिका

गहना नव्या जेम्स

हे वाचा: Gautami Patil : गाैतमी पाटीलविरुद्ध अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

वसीम अहमद भट

अनिरुद्ध यादव

कनिका गोयल

राहुल श्रीवास्तव

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार