Friday , 29 September 2023
Home Jobs Contract Recruitment : शासकीय पदांवर भरती
Jobsघडामोडी

Contract Recruitment : शासकीय पदांवर भरती

Contract Recruitment : शासकीय पदांवर Contract भरती

नोकरी ही सर्वांसमोरील मोठी समस्या आहे. बेरोजगार तरुणांना तर रोज उठल्यावर हाच प्रश्न समोर असतो.
नोकरी कधी मिळेल? कोणती मिळेल? कायमस्वरूपी असेल की कंत्राटी असेल? सरकारी असेल की खाजगी? अश्या असंख्य प्रश्नांनी पिढ्या त्रस्त झालेल्या आहेत.

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाने १३८ संवर्गातील शासकीय पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार असल्याचा GR काढला आहे. ही पदे खाजगी कंत्राटदारांमार्फत भरली जाणार आहेत.

हे वाचा: This rules will change from 1 August 2023 : ऑगस्टपासून 'या' नियमांत होणार बदल

खाजगी कंपन्यांमार्फत कॉन्ट्रॅक्ट च्या माध्यमातून ही शासकीय पदे भरली जाणार आहेत.

राज्य शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध विभागांच्या अंतर्गत ही भरती होणार आहे. रिक्त पदांची संख्या जास्त असल्याने कामाचा ताण कार्यरत असलेल्या लोकांवर जास्त पडतो. ही भरती झाल्याने कामाचा वेग वाढेल अशी अशा निर्माण झाली आहे.

अभियंत्यांपासून शिपायांपर्यंत ही भरती केली जाणार आहे. काही निवडक कंपन्याच ह्या भरतीसाठी निवडल्या गेल्या आहेत. शासकीय कंत्राटी भरतीसाठी ९ खाजगी कंपन्यांना कंत्राट देण्यात आलेले असून त्यांच्या मार्फत ही भरती होणार असल्याचे समजले. ज्या विभागात भरती होणार आहे त्या विभागाच्या मंत्रानी त्या भरतीवर लक्ष ठेवायचे असल्याचे समजते. ह्या खाजगी ९ कंपन्यांना भरती करण्यासाठी दरमहा १५% कमिशन देण्यात येणार आहे. सदरील भरती संदर्भात काम करणाऱ्या कंपन्या ५ वर्षासाठी 5 years contract करारबद्ध असतील.

ह्या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे आरक्षण असणार नाही असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे.

Related Articles

RBI Assistant Recruitment 2023
Jobs

RBI Assistant Recruitment 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेत भरती सुरु, Apply Here

RBI Assistant Recruitment 2023 : भारताची मध्यवर्ती बँक (Central Bank) म्हणजेच भारतीय...

Nashik Police Patil Bharti 2023
Jobs

Nashik Police Patil Bharti 2023 : नाशिक जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांसाठी भरती सुरु

Nashik Police Patil Bharti 2023 : नाशिक जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये पोलीस पाटील’...

Bajaj Pulsar N150
GKघडामोडी

Bajaj Pulsar N150 : बजाज पल्सर N150 लवकरच मार्केटमध्ये

Bajaj Pulsar N150 :  बजाज पल्सरचे नवीन मॉडेल बाजारात येते आहे. Pulsar...