This rules will change from 1 August 2023 : उद्यापासून म्हणजेच 1 ऑगस्ट 2023 पासून पैशाच्या संबंधित काही नियमांत बदल होणार आहेत. या नियम बदलांचा सर्वसामान्यांच्या बचत आणि गुंतवणुकीवर काही अंशी परिणाम होऊ शकतो. 1 ऑगस्ट 2023 पासून नेमक्या कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहे? जाणून घेऊयात याबातची सविस्तर माहिती.
This rules will change from 1 August 2023 : 1 ऑगस्टपासून कोणत्या नियमांत बदल होणार?
This rules will change from 1 August 2023 : LPG सिलेंडरच्या किमतीत बदल :
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल वितरक कंपन्यांकडून घरगुती LPG सिलेंडर आणि व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल केला जातो. म्हणजेच 1 तारखेला LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ किंवा कपात केली जाते. त्यानुसार उद्या LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होऊ शकतो.
हे वाचा: 6 Budget Friendly Furniture Ideas : बजेट फ्रेंडली फर्निचर आयडिया.
This rules will change from 1 August 2023 : ‘या’ बँकेची विशेष FD स्कीम :
1) SBI अमृत कलश विशेष FD स्कीम :
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) अमृत कलश या विशेष FD स्कीममध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख ही 15 ऑगस्ट आहे. म्हणजेच तुम्ही 15 ऑगस्ट 2023 पर्यंत तुम्ही या स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता. या स्कीमचा फायदा असा की या विशेष FD स्कीम (Fixed Deposit) अंतर्गत ग्राहकांना 7.1 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.6 टक्के इजे व्याजदर मिळणार आहे. तसेच ही 400 दिवसांची मुदत ठेव योजना असणार आहे.
हे वाचा: World Ozone Day 16 Sept : जागतिक ओझोन दिवस
2) इंडियन बँक : IND SUPER 400 DAYS
स्टेट बँक ऑफ इंडियाप्रमाणे भारताच्या स्वतंत्र मोहोत्सवी इंडियन बँकेने देखील विशेष FD स्कीम लॉन्च केली होती. या योजनेचे नाव त्यांनी IND SUPER 400 DAYS असं ठेवलं आहे. या विशेष 400 दिवसांच्या FD स्कीम (Fixed Deposit) अंतर्गत तुम्ही 10 हजार ते 2 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकता. इंडियन बँकेच्या या विशेष योजनेअंतर्गत ग्राहकांना 400 दिवसांच्या ठेवींवर 7.25% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याज मिळणार आहे.
इंडियन बँकेने 400 दिवसांसोबत 300 दिवसांची देखील FD स्कीम सादर केली आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना 5 हजार ते 2 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक (Investment) करता येणार आहे. तसेच योजनेअंतर्गत सामान्य ग्राहकांना 7.06 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.55 टक्के व्याज दिले जात आहे. लक्षात ठेवा की या दोन्ही योजनांमध्ये 31 ऑगस्ट 2023 पर्यंतच गुंतवणूक करता येणार आहे.
हे वाचा: How to Lose Weight? वाढलेलं वजन कमी कसं करायचं? जाणून घ्या वजन कमी करण्याच्या 14 Tips.
3) IDFC बँक : महोत्सव मुदत ठेव योजना
वरील दोन्ही बँकेप्रमाणे IDFC बँकेने देखील अमृत महोत्सव मुदत ठेव योजना सुरू केली आहे, IDFC बँकेची ही FD योजना 375 दिवस आणि 444 दिवसांसाठी असणार आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना 375 दिवसांच्या FD वर कमाल 7.60 टक्के व्याज दिले जाणार आहे तर 444 दिवसांच्या FD वर कमाल व्याज 7.75 टक्के व्याज दिले जाणार आहे. या योजनेचा फायदा ग्राहकांना 15 ऑगस्ट 2023 पर्यंत घेता येणार आहे.
This rules will change from 1 August 2023 : Credit Card नियम
Axis बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे Flipkart वरून खरेदी केल्यास ग्राहकांना आता खरेदीवर 1.5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. बँकेने 12 ऑगस्ट 2023 पर्यंत कॅशबॅकमध्ये कपात केली आहे.
This rules will change from 1 August 2023 : आयटीआरसाठी दंड भरावा लागणार :
जर तुम्ही 31 जुलैपर्यंत आयटीआर भरला नाही तर तुम्हाला 1 ऑगस्ट पासून आयटीआरसाठी दंड भरावा लागणार आहे. कारण आयकर विभागाने स्पष्ट केलं आहे की यंदा आयटीआर (ITR) भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यानुसार 31 जुलैनंतर ITR भरल्यास आयकर कायदा 1961 च्या कलम 234F अंतर्गत तुम्हाला 5 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. तसेच ज्यांचं वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी आहे असा लोकांना 1 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
This rules will change from 1 August 2023 : ऑगस्ट महिन्यात बँका तब्बल ‘इतक्या’ असणार बंद :
यंदा ऑगस्ट महिन्यात बँकांना तब्बल 14 दिवस सुट्टी असणार आहे. त्यामुळे बँकांची सर्व कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे.