IBPS PO Recruitment 2023 : पदवीधर असणाऱ्या तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. कारण IBPS मार्फत 3 हजारांपेक्षा अधिक जागांसाठी भरती सुरु झालेली आहे. ह्या मार्फत ज्यांचं पदवी पर्यंतच शिक्षण पूर्ण झालेलं आहे अशा तरुणांना संधी मिळणार आहे. ह्यामध्ये भाग घेण्यासाठी तरुणांना ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागणार आहे. जाणून घेऊयात या भरती बाबतची सविस्तर माहिती.

IBPS PO Recruitment 2023 : IBPS मार्फत भरती सुरु
IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) या पदांच्या तब्बल 3 हजार 049 जागांसाठी भरती होणार आहे. याबाबतची जाहिरात IBPS ने (Institute of Banking Personnel Selection) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्राक्रियेमध्ये भाग कसा घ्यायचा? पात्रता काय आहे? ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
IBPS PO Recruitment 2023 : जाणून घ्या अर्जप्रक्रिया –
पदांचा संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे…
पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
पदसंख्या : पदसंख्या आरक्षित प्रवर्गांप्रमाणे विभागलेली आहे. कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत? याबाबतची माहिती खालील प्रमाणे आहे.
हे वाचा: Bank Job Recruitment : IDBI बँकेत 1036 जागांसाठी भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या.
SC | ST | OBC | EWS | UR | Total |
462 | 234 | 829 | 300 | 1224 | 3049 |
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा :
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 01 जून 2023 पर्यंत सरासरी 20 ते 30 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच यामध्ये मागासवर्गीयांना म्हणजेच SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षांची सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षांची सूट असणार आहे.
हे वाचा: Nashik Police Patil Bharti 2023 : नाशिक जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांसाठी भरती सुरु
शुल्क :
या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल आणि ओबीसी (OBC) या प्रवर्गातील उमेदवारांना आठशे पन्नास रुपये (₹850/-) शुल्क असणार आहे तर एससी (SC), एसटी (ST) आणि पीडब्ल्यूडी (PWD) अशा मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना एकशे पंच्याहत्तर रुपये (₹175/-) शुल्क असणार आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही
IBPS PO Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पाहा.
जाहिरात (Notification) – अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.
ऑनलाईन अर्ज – येथे Click करा.
IBPS PO Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा –
परीक्षा :
पूर्व परीक्षा : सप्टेंबर/ऑक्टोबर 2023
मुख्य परीक्षा : नोव्हेंबर 2023
या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 21 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच परीक्षा कधी घेण्यात येणार आहे? याबाबतची संपूर्ण माहिती नंतर कळविण्यात येणार आहे.