नाशिक जिल्हापरिषदेत १०३८जागांसाठी भरती. जमा झाले कोट्यवधींचे शुल्क.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षात मेगा भरतीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरती सुरु करण्यात आली असून नाशिक जिल्हा परिषदेत जिप नाशिकमध्ये भरतीसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
हे वाचा: IBPS PO Recruitment 2023 : IBPS मार्फत 3 हजारांपेक्षा अधिक जागांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करायचा?
विविध २० संवर्गातील एकूण १०३८ पदांची भरती प्रक्रियेसंदर्भातील जाहिरात ५ ऑगस्टला प्रसिद्ध झाली.
जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर २५ जुलैपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.नाशिक जिपमध्ये १०३८जागांसाठी भरती. Nashik ZP Recruitment जिल्हापरिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी ह्यांनी ह्यासंदर्भात माहिती दिली की एक हजार ३८ जागांसाठी ६४ हजार ८० अर्ज प्राप्त झाले आहेत.
आणि ह्यामधून पाच कोटी ७५ लाख ४३ हजार १०० रुपयांचे शुल्क जमा झाले आहे.
हे वाचा: Nashik Police Patil Bharti 2023 : नाशिक जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांसाठी भरती सुरु
सदरील भरती प्रक्रिया शासन मान्य आयबीपीएस (IBPS) कम्पनीमार्फत राबवण्यात येईल. तलाठी भरती प्रक्रियेतील गडबड पाहता ह्या भरतीतही काही गोंधळ उडू शकतो किंवा काही विघातक प्रवृत्ती प्रलोभन दाखवून आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फसवणुकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी आणि कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये. अशा प्रकारे परीक्षेसंदर्भात आर्थिक मागणी झाल्यास त्यांच्याविरुद्ध जवळच्या पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करावी अशी माहिती जिल्हापरिषदेद्वारे जारी करण्यात आली आहे.
हे वाचा: SBI Recruitment : 439 Posts - स्टेट बँकेत मोठी भरती