Bank Job 2023 : बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये भरती सुरु झालेली आहे. या बँकेमध्ये क्लार्क पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये वाणिज्य शाखेतील पदवी असणाऱ्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी बँकेत नोकरी करण्याची ही उत्तम संधी असणार आहे.
Bank Job 2023 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये भरती सुरु :
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये भरती सुरु झालेली आहे. याबाबतची बँक प्रशासनाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये भाग कसा घ्यायचा? यासाठी अनुभव गरजेचा आहे की नाही? तसेच शैक्षणिक पात्रता काय? अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
हे वाचा: IBPS PO Recruitment 2023 : IBPS मार्फत 3 हजारांपेक्षा अधिक जागांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करायचा?
Bank Job 2023 : जाणून घ्या अर्ज प्रक्रिया –
पदाचे नाव आणि पदसंख्या
पदाचे नाव – ट्रेनी क्लर्क (प्रशिक्षणार्थी लिपिक)
एकूण पदसंख्या – 12 जागा
हे वाचा: Maharashtra Post Office Recruitment 2023 : महाराष्ट्र पोस्ट सर्कल मध्ये 3 हजार जागांसाठी भरती सुरु
Bank Job 2023 : शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
शैक्षणिक पात्रता –
1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्युत्तरांना प्राधान्य देण्यात येणार आहे)
2) एम.एस.सी.आय.टी. किंवा समतुल्य संगणक प्रमाणपत्र आवश्यक
हे वाचा: IDBI Bank Recruitment 600 Posts : IDBI बँकेत भरती.
3) मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असणे आवश्यक आहे.
अनुभव –
कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेमधील (लिपिक पदाचा) कामकाजाचा अनुभव असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येणार आहे.
वयोमर्यादा –
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 06 जुलै 2023 पर्यंत सरासरी 22 ते 35 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण : अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.,अमरावती.
शुल्क : या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी उमेदवाराला 944 रुपयांचे चलन भरावे लागणार आहे.
Bank Job 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पहा
जाहिरात (Notification) – अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.
ऑनलाईन अर्ज – येथे Click करा.
महत्वाच्या तारखा –
या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 20 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच परीक्षा कधी होणार आहे? याबाबतची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
भरतीचे स्वरूप :
या भरती प्रक्रियेअंतर्गत सर्वात आधी बहुपर्यायी स्वरुपाची लेखी परिक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर लेखी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
या भरती प्रकियेबाबत काही अडचण आल्यास तुम्ही अधिक माहितीसाठी वरील जाहिरात पाहू शकता.