Bank of Maharashtra Recruitment 2023 : बहुतांश लोकांचं बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न असतं. त्यातलं त्यात राष्ट्रीकृत बँकेत नोकरी मिळाली तर गोष्टच काही वेगळी असते. परीक्षा उत्तीर्ण करून कोणत्याही राष्ट्रीकृत बँकेत आपल्याला नोकरी मिळाली आहे हे समजताच आक्ख गाव आपल्याला अभिमानाने डोक्यावर मिरवत. घरच्यांचा आनंद तर वेगळाच असतो. जर तुम्ही देखील बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न उराशी बाळगून बँकेच्या [परीक्षाची करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. देशातील राष्ट्रीकृत बँकेत मोठी भरती सुरु झाली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जवळपास 400 जागांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी 13 तारखेपासून अर्ज दाखल करता येणार आहे. जाणून घेऊयात या भरती प्रक्रियेबद्दलची संपूर्ण माहिती…
Bank of Maharashtra Recruitment 2023 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती सुरु
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती सुरु झालेली आहे. 13 जुलै 2023 पासून तुम्ही ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तर या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज कसा आणि कुठे करायचा? (How to apply?) शैक्षणिक पात्रता काय आहे? जाऊन घ्या याबाबतची संपूर्ण माहिती.
हे वाचा: NHPC Recruitment 2023 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये भरती सुरु, 'असा' करा अर्ज
Bank of Maharashtra Recruitment 2023 : जाणून घ्या अर्ज प्रक्रिया –
पदाचे नाव आणि पदसंख्या
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | वयोमर्यादा (31 मार्च 2023 पर्यंत) |
1 | ऑफिसर स्केल III | 100 | 1) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा CA, CMA, CFA 2) 05 वर्षे अनुभव |
25 ते 38 वर्षे |
2 | ऑफिसर स्केल II | 300 | 1) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा CA, CMA, CFA 2) 03 वर्षे अनुभव |
25 ते 35 वर्षे |
एकूण 400 जागा |
वयामध्ये सूट : या भरतीमध्ये मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट आहेत तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्ष सूट असणार आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतामध्ये कुठेही
शुल्क : या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी उमेदवाराला 1 हजार 180 रुपयांचे चलन भरावे लागणार आहे. तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 180 रुपयांचे चलन भरावे लागणार आहे.
Bank of Maharashtra Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा? (How to apply?)
अधिकृत वेबसाईट – येथे पहा
हे वाचा: EMRS Recruitment 2023 : केंद्र सरकारच्या 'या' शाळांमध्ये 6000 जागांसाठी भरती सुरु
जाहिरात (Notification) – अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.
ऑनलाईन अर्ज – येथे Click करा.
महत्वाच्या तारखा –
या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 25 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच परीक्षा कधी होणार आहे? याबाबतची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
या भरती प्रकियेबाबत काही अडचण आल्यास तुम्ही अधिक माहितीसाठी वरील जाहिरात पाहू शकता.