state bank of india : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जवळपास एक हजारहून अधिक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. बँकेने जारी केलेल्या जाहिरातीनुसार चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर आणि सपोर्ट ऑफिसरच्या एकूण 1 हजार 22 पदांची भरती केली जाणार आहे.
उमेदवारांची निवड कशी होईल? : मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यासाठी, प्रथम प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी होईल, त्यानंतर उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. नंतर त्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. 100 गुणांसाठी मुलाखतीच्या आधारे अंतिम निवड यादी तयार केली जाईल. अधिसूचनेनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवार चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर आणि सपोर्ट ऑफिसर या पदांसाठी अर्ज करू शकतात. ही भरती एसबीआयद्वारे एनीटाईम चॅनेलअंतर्गत कंत्राटी पद्धतीने होणार आहे.
हे वाचा: The Unexpected Power of Seeing Yourself as a Villain

पगार किती? (दर महिना) :
▪️ चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर – एनीटाईम चॅनल (CMF-AC): 36 हजार रुपये
▪️ चॅनल व्यवस्थापक पर्यवेक्षक – एनीटाईम चॅनेल (CMS-AC): 41 हजार रुपये
▪️ सपोर्ट ऑफिसर – एनीटाईम चॅनेल (SO-AC): 41 हजार रुपये
सर्वात महत्वाची बाब म्हणजे तरुण उमेदवार अर्ज प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाहीत. या पदांसाठी केवळ एसबीआय किंवा इतर कोणत्याही सरकारी बँकेतील निवृत्त कर्मचारी अर्ज करू शकतात.
अधिक माहितीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी sbi.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी आणि नंतर करिअर विभागात जावे. त्यानंतर, उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून थेट भरती सूचना डाउनलोड करू शकतात.