1BHK, 2BHK And 3BHK Flat : गेल्या काही वर्षात मालमत्तेची किंमत इतकी वाढलीय की मोठ्या पगाराची नोकरी करणारे लोकही घर घेण्यापूर्वी चांगलाच विचार करत आहेत. महागाईच्या जमान्यात सर्वसामान्य व्यक्तीने 1BHK, 2BHK आणि 3BHK फ्लॅट खरेदी buy a flat करणे सोपी बाब राहिलेली नाही. त्यामुळेच अनेकदा व्यक्ती कर्ज वगैरे घेऊन कोणत्या ना कोणत्या मार्गाने घर खरेदी करते. मात्र त्यात बिल्डरने केलेली फसवणूक कधी-कधी महागात पडते. कधी बिल्डर कमी जागेत फ्लॅट तयार करतो, तर कधी ताबा द्यायला अनेक वर्षे लावतो. आज आम्ही तुम्हाला 1BHK, 2BHK आणि 3BHK फ्लॅट्सबद्दल संपूर्ण माहिती देत आहेत…
1 BHK :
यामध्ये एक बेडरूम, एक हॉल आणि किचन मानक आकारात बनवलेले असते. त्याचे क्षेत्रफळ साधारणपणे 400 ते 500 चौरस फूट असते. लहान कुटुंबासाठी किंवा निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबासाठी 1 बीएचके फ्लॅट उत्तम पर्याय आहे. तुम्ही या वन बीएचके फ्लॅटचा हॉल मुलांसाठी बनवलेली वन बेडरूम म्हणून वापरू शकता. जर तुमचे बजेट थोडे जास्त असेल तर तुम्ही 1.5 BHK अपार्टमेंट देखील खरेदी करू शकता. यात दोन खोल्या असतात. एक मानक आकाराचा मास्टर बेडरूम आणि दुसरा मानक आकारापेक्षा थोडा लहान बेडरूम असतो.
हे वाचा: Recharge plan : सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन कोणाचा? एअरटेल, जिओ की वोडाफोन-आयडिया…
2 BHK :
यामध्ये दोन बेडरूम, एक हॉल आणि एका युनिटमध्ये एक स्वयंपाकघर असते. या फ्लॅटच्या मास्टर बेडरूममध्ये खोल्यांच्या बाहेर टॉयलेट आणि गेस्ट वॉशरूम संलग्न असते. हे फ्लॅट्स विशेषतः लहान मुलांसह मध्यम आकाराच्या कुटुंबांसाठी बेस्ट आहेत . जर तुम्हाला 2 BHK पेक्षा थोडी जास्त जागा हवी असेल आणि 3 BHK तुमच्या बजेटच्या बाहेर असेल तर तुम्ही 2.5 BHK पाहू शकता. 2.5 BHK मध्ये 2 मास्टर बेडरूम, एक लहान खोली, एक लिव्हिंग रूम आणि एक स्वयंपाकघर असते. त्याचे क्षेत्रफळ साधारणपणे 950 चौरस फुटांपेक्षा जास्त असते.
3 BHK :
यामध्ये तीन बेडरूम, एक हॉल आणि एक स्वयंपाकघर असते. विशेषतः लहान आणि मोठ्या दोन्ही शहरांमध्ये अशा अपार्टमेंटची विक्री वेगाने होत असल्याचे चित्र आहे. मात्र, विशेषत: मुंबई आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये 3 बीएचके फ्लॅट अधिक लोकप्रिय होत आहेत. येथील 3 BHK फ्लॅटमध्ये वॉशरूमचे तीन सेट असतात, त्यापैकी दोन खोल्यांशी संलग्न आहेत आणि तिसरे गेस्ट वॉशरूम बाहेरील बाजूस असते. असे असले, तरी त्याची किंमत 2 BHK पेक्षा कितीतरी जास्त असते.
हे वाचा: आधार कार्डवर फसवणूक होऊच शकत नाही, नवीन सेफ्टी फिचर लॉंच