“चलो बारिश में घुमने
थोडी मस्ती ढेर सारा मजा”
Monsoon Traveling Destinations : पावसाळ्यातली भटकंती ही अनेकांना वेड लावणारी असते. कॉलेजकाळापासून अनेक जण भटकायला सुरुवात करतात. गड किल्ले तर आवडीचा विषय असतोच, पण जंगल झाडी, डोंगर-दऱ्या, समुद्र किनारे अश्या भटकंतीला कोण नाही म्हणेल!! भिजवणारा पाऊस, सोबत मस्त कांदा भजी, मॅगी, मक्याचे भाजलेले कणीस अन वाफाळता चहा किंवा कॉफी अहाहाहा…. मस्तच आम्ही काही हटके जागा सुचवतो तुम्हाला ह्या पावसाळ्यात जरून जाऊन या … भरपूर फोटो काढा मज्जा करा.
हे वाचा: Deepfake Technology : डीपफेक टेक्नॉलॉजी : सत्य की आभास
Monsoon Traveling Destinations : पावसाळ्यात फिरण्यासारखी महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे :
Monsoon Traveling Destinations : येऊर –
मुंबई ठाण्यापासून जवळ असलेले येऊरचे जंगल पावसाळ्यात काही खासच वाटते. हिरव्या रंगाची चादर ओढलेलया टेकड्या, बहरलेली झाडी आणि मधूनच दिसणारे पक्ष्यांचे थवे म्हणजे कमालच.
जंगल पर्यटनाचा आनंद इथे मिळू शकतो. पक्षी निरीक्षण करायला पण संधी असते जर पाऊस थांबलेला असेल तर. मात्र जंगलात फिरताना आरडाओरडा, धांगडधिंगा जरा जपूनच बरका. आणि कचरा तर नकोच निसर्गात. ह्या दोन गोष्टी पाळल्या तर निसर्ग भरभरून देईल आनंद.
हेही वाचा : व्यावसायिक कर्ज घेण्याचा फायदा काय? ‘का’ घेतलं पाहिजे बिझनेस लोन? जाणून घ्या
Monsoon Traveling Destinations : चिचोंटी –
मुंबई अहमदाबाद हायवेला असलेले हे ठिकाण घनदाट झाडीतून रस्ता काढत जावे लागणारे आहे. भरपूर धबधबे आणि हिरवागार निसर्ग ह्या भागात अनुभवायला मिळतो. काही छोटे धबधबे तर काही मोठे धबधबे अनुभवायला मिळतात. धबधब्यात भिजणे हा एक मोठा वेगळा अनुभव असतो.
हे वाचा: How To Avoid Food Poisoning : पावसाळयात फूड पॉयझनिंग टाळण्यासाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे?
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे : भीमाशंकर –
पावसाळ्यात भीमाशंकरला जर गेलात तर हिरव्या रंगाच्या अनेक शेड्स तुम्हाला दिसतील. झुळझुळ वाहणारे झरे, खळखळ वाहणारे धबधबे मन प्रसन्न करतात. सोबतच देवदर्शन घेऊन निसर्गाचा आनंद तुम्ही उपभोगू शकता. जोडून सुट्टी आली असेल तर मात्र ट्राफिक जाम अनुभवायला लागू शकते. मात्र निसर्ग सगळ्या त्रासातून आपल्याला केवळ आनंद देत असतो.
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे : लोणावळा-खंडाळा –
हे ट्वीन हिल स्टेशन तर आपणाला माहीतच आहेत, पण लोणावळा-खंडाळा पायी ट्रेक करणे पण आनंददायी आहे. ड्युक्स नोज असेल किंवा कार्ल भाजे लेणी असतील किंवा अँबी व्हॅली असेल, एखाद्या ठिकाणी कॅम्पिंग पण करायला हरकत नाही. लोणावळा-खंडाळा वनडे ट्रिप साठी योग्य ठिकाण आहे.
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे : कोलाड –
रायगड जिल्ह्यात येणारे कोलाड जरा हटके ठिकाण आहे. कुंडलिका नदी वाहते इथून. साहसी खेळ रिव्हर राफ्टिंग साठी इथं बरीच मंडळी येत असतात. आसपास अनेक ठिकणारे आहेत जिथे तुम्ही मस्त एन्जॉय करू शकतात. इथे पोहोचताना पण अनेक छोटे मोठे पिकनिक स्पॉट्स लागतील जिथे तुम्ही थांबून फोटो काढू शकता, एन्जॉय करू शकता.
पावसाळा जसा निसर्ग प्रसन्न करतो तसेच मन पण प्रसन्न करतो. कोणत्याही ट्रिप/ट्रेकला जाताना नियोजन करूनच जावे. निसर्गाच्या जवळ जाताना सेल्फी काढताना जपून बरका. मुळात निसर्ग जितका मनात साठवता येतो तितका फोटोत मावत नाही. त्यामुळे निसर्गात मन भरून ऊर्जा घ्यावी आणि इतरांना पण घेऊ द्यावी.