Saturday , 30 September 2023
Home Food How To Avoid Food Poisoning : पावसाळयात फूड पॉयझनिंग टाळण्यासाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे?
FoodHealthLifestyle

How To Avoid Food Poisoning : पावसाळयात फूड पॉयझनिंग टाळण्यासाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे?

How To Avoid Food Poisoning : पावसाळयात फूड पॉयझनिंग टाळण्यासाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे?
How To Avoid Food Poisoning : Letstalk

How To Avoid Food Poisoning : आला पावसाळा तब्येत जsssरा सांभाळा… पावसाळ्यात अन्न विषबाधा फूड पॉयझनिंग ही एक मोठी समस्या आहे. कारण पावसाळ्यात जीवाणूंच्या वाढीसाठी पोषक असलेले वातावरण तयार होते. उच्च आर्द्रता आणि वाढत्या पावसामुळे पाणी दूषित होऊन पाण्यातून अनेक आजार पसरतात.

How To Avoid Food Poisoning : पावसाळयात फूड पॉयझनिंग टाळण्यासाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे?
How To Avoid Food Poisoning : Letstalk

How To Avoid Food Poisoning In Monsoon : पावसाळ्यात अन्नातून विषबाधा होण्याची काही कारणे –

1 ओलावा वाढणे : पावसाळ्यातील उच्च आर्द्रता आणि बदललेले तापमान हे जीवाणूंच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार करतात.

हे वाचा: What Is Recycling and How to Do? : रिसायकल काय आणि कसं करता येईल? जाणून घ्या Benefits of Recycling

2 पाणी दूषित : पूर आणि पाणी साचल्याने पाण्याचे स्रोत दूषित होतात, ज्यामुळे आजार पसरू शकतात.

3 अन्न हाताळण्याच्या पद्धती : स्वच्छतेच्या अयोग्य पद्धती, जसे की हात व्यवस्थित न धुणे किंवा अन्न पूर्णपणे न शिजवणे अश्या अनेक गोष्टी अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढवू शकतो.

4 कच्च्या किंवा कमी शिजलेल्या पदार्थांचे सेवन : कच्चे किंवा कमी शिजलेले पदार्थ, जसे की सीफूड, मांस आणि अंडी खाल्ल्याने अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढू शकतो.

हे वाचा: Rainy Season Destinations : पावसाळ्यात भटकंती करता येतील अशी काही ठिकाणे

5 शिळे अन्न खाणे, ताजे पदार्थ न खाणे, रस्त्यावरले पदार्थ खाणे.

Symptoms of Food Poisoning : अन्न विषबाधेची काही लक्षणे :

  1. अतिसार
  2. उलट्या होणे
  3. मळमळ
  4. पोटाच्या वेदना
  5. ताप
  6. थंडी वाजते
  7. डोकेदुखी
  8. स्नायू दुखणे

आपल्याला यापैकी कोणतीही लक्षणे (Symptoms of Food Poisoning) आढळल्यास, ताबडतोब वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा : मुलं वयात येताना ‘ह्या’ गोष्टी शिकवणे योग्य; जाणून घ्या सविस्तर माहिती 

हे वाचा: Top 5 Rice Brands in India : भारतातील सुप्रसिद्ध Rice ब्रँड्स कोणते? जाणून घ्या.

How To Avoid Food Poisoning : पावसाळ्यात अन्न विषबाधा टाळण्यासाठी येथे महत्वाच्या टिप्स :

अन्न हाताळण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर आपले हात साबणाने आणि पाण्याने चांगले स्वच्छ धुवा.

  • अन्न नीट शिजवा.
  • शिळे अन्न खाऊ नका.
  • कच्चे किंवा कमी शिजलेले पदार्थ खाणे टाळा.
  • पिण्याचे पाणी उकळून गार करूनच प्या.
  • फिल्टरचे पाणी शक्यतो प्यायचा विचार करा.
  • बाहेर जेवताना विशेष काळजी घ्या.
  • सॅलड्स, उघड्यावरचे अन्नपदार्थ, चमचमीत तेलकट पदार्थ, अतिप्रमाणात नॉनव्हेज खाणे टाळा.

How To Avoid Food Poisoning : तुम्हाला अन्नातून विषबाधा झाल्यास काय कराल :

  • डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • मनाने औषधे घेणे टाळा.
  • निर्जलीकरण म्हणजे डीहायड्रेट होणार नाही अशी काळजी घ्या.
  • घरी केलेले ताजे साधे कमी तेलकट अन्नच खावे.

एक लक्षात घ्या, आपल्या शरीराला बरे होण्यासाठी वेळ लागतो. एका क्षणात जरी आजारी पडलो आपण तरी बरे व्हायला वेळ लागतोच. हलका आहार घेणे उत्तम. घरातले पूर्ण शिजवलेले आणि ताजे अन्न खावे. आजारी न पडण्यासाठी नियमित काळजी घेतली तर आजारी पडण्याची शक्यता कमी होते.

Related Articles

6 Budget Friendly Furniture Ideas
Lifestyle

6 Budget Friendly Furniture Ideas : बजेट फ्रेंडली फर्निचर आयडिया.

6 Budget Friendly Furniture Ideas : फर्निचर ही आजच्या युगात एकदम गरजेची...

Benefits of Cashew Nuts
Health

Health Benefits of Cashew Nuts : आरोग्यदायी काजू

Health Benefits of Cashew Nuts : पोषणमूल्ये असलेले काजू – आरोग्यदायी काजू...

Healthघडामोडी

World Ozone Day 16 Sept : जागतिक ओझोन दिवस

World Ozone Day : जागतिक ओझोन दिवस जागतिक ओझोन दिवस दरवर्षी 16...