World No Tobacco Day : धूम्रपान सोडणे हा स्वतःच्या आणि आपल्या जवळच्या लोकांच्या आरोग्यासाठी एक उत्तम निर्णय आहे. हे सोपे नक्कीच नसेल, परंतु तुम्ही केलेला दृढनिश्चय आणि योग्य रणनीती वापरून तुम्ही यशस्वीरित्या धूम्रपान सोडू शकता.
World No Tobacco Day : सिगरेट सोडायचा निश्चय करत आहात तर ‘ह्या’ काही टिप्स तुमच्या फायद्याच्या ठरतील.
धूम्रपान सोडण्याची तारीख सेट करा :
धूम्रपान बंद करण्यासाठी एखादी खास अशी विशिष्ट तारीख निवडा आणि ती तुमच्या कॅलेंडरवर स्टार मार्क करा.
World No Tobacco Day : स्वत:ला ह्या बदलासाठी तयार करा :
तुम्हाला धूम्रपान का सोडायचे आहे याची कारणे स्वतःला पटवून द्या आणि भविष्यात जेव्हा तुम्हाला मोह येईल तेव्हा या कारणांची आठवण करून द्या. धूम्रपान सोडण्याने होणारे आरोग्य विषयक फायदे आणि धूम्रपानाच्या हानिकारक प्रभावांबद्दल स्वतःला आधी प्रशिक्षित करा.
हेही वाचा : What is Metaverse ? : ये मेटाव्हर्स आखिर क्या है?
World No Tobacco Day : आपल्या जवळच्या लोकांचे समर्थन मिळवा :
धूम्रपान सोडण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना आणि नेहमी ज्यांच्यासोबत सिगरेट ओढता त्यांना कळवा. नो स्मोकिंग सपोर्ट ग्रुपमध्ये सामील होण्याचा किंवा आवश्यक असल्यास व्यावसायिक मदत घेण्याचा विचार करा, जसे की समुपदेशन किंवा थेरपी.
ट्रिगर पॉईंट ओळखून त्यावर उपाय काढा :
सिगरेट ओढण्याचा ट्रिगर पॉईंट ओळखा आणि ते टाळण्याचा प्रयत्न करा. विशेषत: सोडण्याच्या सुरुवातीच्या काळात हे कराच करा. तुमचे घर, कार आणि कामाच्या ठिकाणी सिगारेट, लाइटर पासून दूर रहा.
हेही वाचा :भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकिंग; जाणून घ्या
दुसरा हेल्दी पर्याय शोधा :
निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी (NRT) प्रोडक्टस जसे की निकोटीन गम, पॅचेस किंवा लोझेंज वापरण्याचा विचार करा.
हे वाचा: Oscar : ऑस्कर विजेत्यांना नक्की काय-काय मिळते? वाचा ए टू झेड बाबी…
ताण-तणाव व्यवस्थापित करा :
धूम्रपान ही अनेकदा तणावाचा सामना करण्यासाठी सवय बनलेली असते. नियमित व्यायाम, दीर्घ श्वास घेणे, ध्यान करणे किंवा तुम्हाला आवडत असलेल्या छंदांमध्ये गुंतणे यासारखे ताण-तणाव व्यवस्थापित करण्याचे निरोगी मार्ग शोधा.
सक्रिय राहा :
नियमित शारीरिक हालचाली, दमसास वाढवणारे व्यायाम प्रकार तुम्हाला धुम्रपानापासून दूर ठेवण्यास मदत करतील.
सकारात्मक आणि चिकाटीने टिकून राहा :
धूम्रपान सोडणे हा एक प्रवास आहे आणि वाटेत अडथळे येऊ शकतात. अनुभवातून शिका आणि व्यसन सोडण्याच्या आपल्या ध्येयाकडे कायम लक्ष असू द्यात.