Saturday , 27 July 2024
Home government schemes Mahamesh Yojana : राजे यशवंतराव होळकर ‘महामेश योजना’; नेमकी काय आहे ‘ही’ योजना? जाणून घ्या
government schemes

Mahamesh Yojana : राजे यशवंतराव होळकर ‘महामेश योजना’; नेमकी काय आहे ‘ही’ योजना? जाणून घ्या

Mahamesh Yojana : Letstalk

Mahamesh Yojana : महाराष्ट्रात मेंढ्या पालनाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात होत. कालांतराने मध्यंध्य पालनात मोठी घट झाली आहे. राज्यातील मेंढीपालनातील घट रोखण्यासासाठी राज्य शासनाने एक महत्वाचं पाऊल उचललं होत. राज्यातील मेंढ्यांची संख्या वाढवण्यासाठी तसेच राज्यातील मेंढ्या पालनाच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘महामेश योजना’ सुरु केली होती.

Mahamesh Yojana : Letstalk

या योजनेअंतर्गत सरकारकडून मेंढीपालकांना मेंढ्या, मेंढ्यांसाठी खाद्य आणि इतर बाबींसाठी म्हणून 75% अनुदान दिले जाते तसेच चारा आणि फीड मिल्सच्या गाठी तयार करण्यासाठी यंत्रणा उभारण्यासाठी 50% अनुदान दिले जाते. नेमकी काय आहे ही योजना? जाणून घेऊयात.

हे वाचा: Free Gas Connection : मोफत गॅस कनेक्शन - उज्ज्वला 2.0 योजना

Mahamesh Yojana : नेमकी काय आहे ही योजना?

राज्यातील मेंढीपालनाचा व्यवसाय वाढवण्यासाठी सरकारने ही योजना चालू केली होती. आता या योजनेचा लाभ कोणाला घेता येणार? या योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत? कागतपत्रे कोण-कोणती लागतात? अर्ज कुठे करायचा? याबाबतची सर्व माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.

Mahamesh Yojana : अनुदान कसं मिळणार?

या योजनेअंतर्गत मेंढीपालकांना मेंढ्या, मेंढ्यांसाठी खाद्य आणि इतर बाबींसाठी म्हणून 75% अनुदान दिले जाते तसेच चारा आणि फीड मिल्सच्या गाठी तयार करण्यासाठी यंत्रणा उभारण्यासाठी 50% अनुदान दिले जाते. तसेच ज्यांना हा व्यवसाय सुरु करायचा आहे अशा लाभार्थ्यांना सरकारकाढून 20 मेंढ्या व एक नार मेंढी दिली जाते. या मेंढ्यांचे वाटप 75% अनुदानावर केले जाते. एवढंच नाही तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करताना महिलांसाठी 30% आणि अपंगांसाठी 3% आरक्षण देण्यात आले आहे.

या योजनेसाठी पात्रता निकष काय?

ही योजना फक्त भटक्‍या जमाती (भज-क) श्रेणीतील लाभार्थ्यांना लागू आहे. अन्य प्रवर्गातील व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. तसेच लाभार्थी हा महाराष्ट्रातील नागरिक असला पाहिजे. यासोबत लाभार्थीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त नसले पाहिजे. सविस्तर पात्रता निकष जाणून घेण्यासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.

हे वाचा: Saral Jeevan Bima Yojana : स्वस्त आणि मस्त सरकारी विमा योजना 'सरल जीवन विमा योजना (SJBY)

महामेश योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :

या योजनेसाठी आधार कार्ड, शिधापत्रिका, रहिवासी पुरावा, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, जमिनीची कागदपत्रे, जमिनीतील सह-भागीदारांचे ना हरकत प्रमाणपत्र, पशुपालन प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, वयाची नोंदणी आणि उत्पन्नाचा दाखल या सर्व कागतपत्रांची आवश्यकता असते.

Mahamesh Yojana : अर्ज कुठे करायचा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. अर्ज महामंडळाच्या www.mahamesh.in या अधिकृत वेबसाईटवरून दाखल करू शकता किंवा MAHAMESH या App वरून देखील अर्ज करू शकता. अर्ज दाखल केल्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी केली जाईल. तसेच तुमची शासकीय पद्धतीने तुमची निवड केली जाईल. निवड झाल्यास तस तुम्हाला कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट : येथे पहा 

हे वाचा: National Career Service : नॅशनल करिअर सर्विस : नोकरी शोधणाऱ्यांसाठी सरकारी व्यासपीठ.

महामेश योजनेबाबतच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. 







Subscribe Now

    Subscribe to our mailing list to receives daily updates direct to your inbox!

    Related Articles

    Chief Minister Aid Fund
    government schemes

    Chief Minister Aid Fund : उपचारासाठी पैशांची गरज भासतेय? कॉल करा आणि मिळवा गंभीर आजारांसाठी 2 लाखांपर्यंत अर्थसाहाय्य

    Chief Minister Aid Fund : मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय उपचारांसाठी मिळणारे अर्थसाहाय्य ह्यासाठी एक...

    PM Vishwakarma Yojana
    government schemes

    PM Vishwakarma Yojana : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना

    PM Vishwakarma Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी केंद्र सरकारने विश्वकर्मा योजना लाँच...

    FreeGasConnection
    government schemes

    Free Gas Connection : मोफत गॅस कनेक्शन – उज्ज्वला 2.0 योजना

    Free Gas Connection : आता गॅस कनेक्शन पण मिळणार मोफत. उज्ज्वला 2.0...

    Central Govt Action Plan
    government schemesघडामोडी

    Central Govt – Scrap selling : भंगार विका, पैसे मिळवा.

    भंगार विका, पैसे मिळवा. अश्या प्रकारच्या मोहिमा आपण अनेकदा पाहतो. गौरी गणपती...