Thursday , 25 April 2024
Home Jobs IBPS Recruitment 2023 : IBPS मार्फत 8 हजारांपेक्षा अधिक जागांवर भरती होणार; अर्ज कसा करायचा? पहा.
Jobs

IBPS Recruitment 2023 : IBPS मार्फत 8 हजारांपेक्षा अधिक जागांवर भरती होणार; अर्ज कसा करायचा? पहा.

IBPS Recruitment 2023 : Letstalk
IBPS Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. IBPS मार्फत 8 हजारांपेक्षा अधिक विविध पदांच्या जागा भरल्या जाणार आहे. या जागा भरण्यासाठी IBPS ने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार ऑफिस लेव्हलच्या विविध जागा भरण्यात येणार आहे. तसेच जागांची संख्या देखील जास्त आहेत. परंतु अर्ज दाखल करण्यासाठी पात्रता ही पदांनुसार वेगवेगळी असणार आहे. तसेच इतर पात्रतेमध्ये OBC किंवा इतर प्रवर्गाच्या उमेदवारांना विशेष सूट दिली जाणार आहे. तर जाणून घेऊयात या भरती बाबतची सविस्तर माहिती….

IBPS Recruitment 2023 : IBPS मार्फत 8 हजारांपेक्षा अधिक जागांवर भरती

IBPS मार्फत 8 हजारांपेक्षा अधिक म्हणजे तब्बल 8611 जागांवर विविध पदांसाठी भरती होणार आहे. याबाबतची जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे पदवीधर किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण झालेल्या तसेच चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.

IBPS Recruitment 2023 : भरतीबाबतची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे –

या भरती प्रक्रियेमध्ये भाग कसा द्यायचा? पदांनुसार नेमकी पात्रता काय आहे? अर्ज कसा आणि कुठे करायचा? याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या : जागा

  • ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – 5538 जागा
  • ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) – 2485 जागा
  • ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) – 60 जागा
  • ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) – 03 जागा
  • ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) – 08 जागा
  • ऑफिसर स्केल-II (लॉ) – 24 जागा
  • ऑफिसर स्केल-II (CA) – 21 जागा
  • ऑफिसर स्केल-II (IT) – 67 जागा
  • ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) – 332 जागा
  • ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) – 73 जागा
एकूण जागा : 8611

IBPS Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

विविध पदांनुसार पात्रता देखील वेगवेगळी आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पाहावी.

 वयोमर्यादा :

विविध पदांनुसार उमेदवाराचे हे किती असावे हे ठरवले गेलेले आहे. तसेच जनरल वगळता दुसऱ्या प्रवर्गासाठी वयोमर्यादेमध्ये विशेष सूट दिलेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना वयोमर्यादेच्या विस्तृत माहितीसाठी तुम्हाला खाली देण्यात आलेली जाहिरात पाहावी लागणार आहे.
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

IBPS Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पहा 

ऑनलाईन अर्ज –

ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी पदांनुसार लिंक ही वेगवेगळी आहे. कृपया अर्ज दाखल करताना ज्या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्या पदांसाठी असलेली लिंकवर क्लिक करा.
पद क्र.1 ऑनलाईन अर्ज : येथे करा  
पद क्र.2 ऑनलाईन अर्ज : येथे करा 
पद क्र.3 ते 10 ऑनलाईन अर्ज : येथे करा 

IBPS Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा

परीक्षा कधी आहे?
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर पूर्व परीक्षा ही ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात येणार आहे तर एकल/मुख्य परीक्षा ही सप्टेंबर 2023 मध्ये असणार आहे. या दोन्ही परीक्षेची तारीख आणि वेळ IBPS कडून कळविण्यात येईल.
वरील भरती प्रक्रियेत 21 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.

हे वाचा: Government Job Recruitment : भारतीय नौदलात भरती सुरु; महिलांसाठीही राखीव जागा : असा करा अर्ज.







Subscribe Now

    Subscribe to our mailing list to receives daily updates direct to your inbox!

    Related Articles

    MUCBF Recruitment 2024
    Jobs

    MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

    MUCBF Recruitment 2024 : तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र...

    AIIA Recruitment 2024
    Jobs

    AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

    AIIA Recruitment 2024 : तरुणांना नोकरी करण्याची संधी आहे. आखिल भारतीय संस्थेमध्ये...

    BIS Recruitment 2024
    Jobs

    BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

    BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय...

    SBI Clerk Recruitment 2023
    Jobs

    SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

    SBI Clerk Recruitment 2023 : बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी भारताची...