Chief Minister Aid Fund : मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय उपचारांसाठी मिळणारे अर्थसाहाय्य ह्यासाठी एक हन्नात योजना आखली आहे. ह्या योजने अंतर्गत गरजुंना 20 गंभीर आजारांसाठी तसेच ऑपरेशनसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून तब्बल 25,000 ते 2,00,000 रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य मिळणार आहे.
Chief Minister Aid Fund : ही मदत कशी मिळणार? पाहा
अर्थसाहाय्य मिळवण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करायचा आहे. त्यानंतर काही सेकंदामध्ये तुम्हाला एक मेसेज येईल. त्यात तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. म्हणजे सहायता कशी मिळेल? ह्यासाठी कोणती कागतपत्र आवश्यक आहेत? ह्या अंतर्गत किती व कोणते आजार आहेत? तसेच मदत किती मिळणार. ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल.
हे वाचा: Samarth Yojana : वस्त्रोद्योग मंत्रालयाची एक अनोखी विकास योजना.
काही दिवसांतच मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार संबंधित रुग्णाला अर्थसाहाय्य केले जाते.
Chief Minister Aid Fund : कोणते कागतपत्र आवश्यक?
वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र (खासगी रुग्णालय किंवा सिव्हिल हॉस्पिटलकडून प्रमाणित केलेले)
तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक 1.60 लाखांपेक्षा कमी उत्पन्न अपेक्षित)
रुग्णाचे आधारकार्ड, लहान बाळासाठी आईचे आधारकार्ड
रुग्णाचे रेशनकार्ड, आजाराचे रिपोर्ट
प्रत्यारोपण रुग्णासाठी शासकीय समितीची मान्यता असलेले प्रमाणपत्र
हे वाचा: Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana : दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना
मुख्यमंत्री सहायता निधी : कोणत्या आजारांसाठी मिळणार अर्थसाहाय्य?
कॉकलियर इम्प्लांट (2 ते 6 वर्षे वयोगट), हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, बोनमॅरो प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात शस्त्रक्रिया, लहान बालकांच्या शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसिस, कर्करोग केमोथेरपी किंवा रेडिएशन, अपघात, नवजात शिशुंचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, बर्न रुग्ण (भाजलेला रुग्ण), विद्युत अपघात रुग्ण अशा 20 गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मिळतो.
हे लक्षात ठेवा…
www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर रुग्ण व जिल्हा समन्वयकांची यादी मिळेल.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील रुग्णावर मोफत उपचार केले जातात.
cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मिळेल मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतील रुग्णालयांची माहिती
एकंदरीत, सध्या राज्यामध्ये राज्य शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना तसेच केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना ह्या दोन योजना रुग्णांसाठी सुरु आहेत. ह्या अंतर्गत रुग्णांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात. तसेच वरील योजनांमधून किंवा चॅरिटी हॉस्पिटल व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातून उपचार न मिळाल्यास रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आधार दिला जातो.