Mahindra Bolero Neo Plus : महिंद्रा ची बोलेरो गाडी रगडो मगर स्टाईल से हा फीलिंग देणारी आहे. पहिल्यांदा बोलेरो 2000 साली मार्केटमध्ये आलेली. बोलेरो पीकप, बोलेरो कॅम्पर, बोलेरो निओ अश्या व्हर्जन्समध्ये बोलेरो मार्केट मध्ये धूम करंट राहिलेली आहे.

Mahindra Bolero Neo Plus Price : किंमत किती असेल?
आता येते आहे, बहुचर्चित, बहूप्रतिक्षीत 9 सीटर बोलेरो निओ प्लस (Mahindra Bolero Neo Plus). महिंद्रा बोलेरो निओ प्लस ही 9-सीटर SUV आता भारतात लॉन्च होण्यासाठी सज्ज आहे. SUV बोलेरो निओवर ही सिरीज 2022 मध्ये लाँच झालेली. ही येणारी बोलेरो निओ प्लस असेल जीची बेसीक किंमत (Mahindra Bolero Neo Plus Price) ₹10 लाख ते 12 लाख रुपयांच्या `दरम्यान असण्याची अपेक्षा आहे.
हे वाचा: What is POCSO Act : पॉक्सो कायदा म्हणजे काय? ह्या कायद्याचा नेमका कश्याप्रकारे उपयोग होतो?
(Bolero Neo Plus) बोलेरो निओ प्लस 2.2-लिटर डिझेल इंजिन असलेली 118 bhp पॉवर आणि 280 Nm टॉर्क निर्माण करणारी असेल. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचे असेल तर ह्या नव्या SUV ची इंधन कार्यक्षमता सुमारे 14 kmpl अपेक्षित आहे.
हेही वाचा : सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी टॉप फायनान्स टिप्स; जाणून घ्या सविस्तर माहिती
(Bolero Neo Plus) बोलेरो निओ प्लसमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रिव्हर्स कॅमेरा आणि पार्किंग सेन्सरसह अनेक वैशिष्ट्ये असतील. ह्या SUV मध्ये ड्युअल एअरबॅग्ज, ABS आणि EBD यासह अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये अपग्रेडेड स्वरूपात असू शकतील.
हे वाचा: Education Loan : शैक्षणिक कर्ज म्हणजे काय? Education Loan कसं मिळवायचं? जाणून घ्या.
अघळपघळ, प्रशस्त आणि परवडणारी 9-सीटर SUV चा शोध आता इथं थांबू शकेल. बोलेरो निओ प्लस हा एक चांगला पर्याय उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. फॅमिली, बिझनेसेस साठी ही SUV लोकप[रिया होऊ शकेल.
Mahindra Bolero Neo Plus : महिंद्रा बोलेरो निओ प्लसची काही प्रमुख वैशिष्ट्ये येथे आहेत:
- 9-सीटर आसन क्षमता
- 2.2-लिटर डिझेल इंजिन
- 118 bhp पॉवर
- 280 Nm टॉर्क
- 5-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन
- सुमारे 14 kmpl इंधन कार्यक्षमता
- टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
- रिव्हर्स कॅमेरा
- पार्किंग सेन्सर
- ड्युअल एअरबॅग्ज
- ABS
- EBD
महिंद्राने गेल्या काहीवर्षात कार सेगमेंटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे.