India vs Pakistan Football Match : कालपासून दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेला (SAFF Championship 2023) सुरुवात झाली आहे. या चॅम्पियनशिपचा शुभारंभ भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan Football Match) यांच्यातल्या हाय व्होल्टेज सामन्याने झाला. आणि सामना देखील तसाच झाला. पहिल्याच सामन्यात भारतीय फुटबॉल संघाने पाकिस्तानचा अक्षरशः धुव्वा उडवला. भारताने एकहाती वर्चस्व ठेवत हा सामना 4-0 अशा गोल फरकाने जिंकला. संपूर्ण सामन्यादरम्यान भारतीय संघाने पाकिस्तानला आक्रमण करण्याची एकही संधी दिली नाही.
भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला भारतीय संघाचा कॅप्टन स्टार प्येअर सुनील छेत्री (Sunil Chhetri). सुनीलने 3 गोल करत आपली हॅट्रिक पूर्ण केली. त्याशिवाय उदांता सिंहने 81व्या मिनिटाला गोल करून भारताच्या विजयावर आपलं देखील नाव कोरल. पण भारत पाकिस्तान सामना (India vs Pakistan Football Match) म्हटल्यावर हाय व्होल्टेज ड्रामा होणार नाही असं कधीच होणार नाही. मग तो सामना क्रिकेटचा असो, हॉकीचा असो फुटबॉलचा असो किंवा इतर कोणत्याही खेळाचा असो. या सामन्यात देखील असंच झालं…. खेळ व्यवस्थित चालू असताना 45व्या मिनिटाला असं काही घडलं की भर पावसामध्ये सगळं वातावरण गरम झालं..
हे वाचा: Gold Silver Rate Today : सोनं झालं स्वस्त? काय आहे आजचे सोन्या-चांदीचे भाव? पाहा.
हेही वाचा : जेष्ठ नागरिक बचत योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती
India vs Pakistan Football Match : नेमकं असं झालं तरी काय?
45 मिनिटाआधी खेळ व्यवस्थित चालू होता. एवढ्या वेळामध्ये भारताने 2-0 अशा गोल फरकाने आपलं वर्चस्व राखलं होत. तथापि भारतीय खेळाडू पाकिस्तानचा डिफेन्स फोडून काढत होता. अटॅक करण्याची एकही संधी त्यांना मिळत नव्हती. साहजिकच त्यांचा संयम तुटत चालला होता. सामना सुरु असताना ४५व्या मिनिटाला पाकिस्तानचे खेळाडू टीम इंडियाचं कोचला भिडले. झालं असं की पाकिस्तानी खेळाडू थ्रो इन घेत असताना भारतीय कोच इगोर स्टिमॅक यांनी फुटबॉलला हात मारून बॉल खाली पडला. त्यानंतर खरा ड्रामा सुरु झाला.
IND vs PAK sees RED in the first half 🤯
हे वाचा: Engineer's Day : अभियंता दिवस-15 Sept
India vs Pakistan is never fully complete without the fireworks and heated emotions 💥#INDvPAKonFanCode #SAFFChampionship2023 pic.twitter.com/xJLZTmcrp5
— FanCode (@FanCode) June 21, 2023
हे वाचा: Amit Thackeray In Ahmednagar : अमित ठाकरे यांच्या दाैऱ्याची मनविसेकडून जय्यत तयारी
थ्रो इन करताना भारतीय कोच इगोर स्टिमॅक यांनी फुटबॉलला हात मारल्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू इगोर स्टिमॅक यांच्यावर धावून गेले. त्यानंतर भारतीय खेळाडू देखील मधी पडले. तसेच दोन्ही संघाच्या खेळाडूमध्ये धक्काबुक्की देखील झाल्याचं वृत्त समोर आला आहे. हा राडा बराच वेळ चालल्यानंतर रेफरीच्या मध्यस्थीमुळे हे प्रकरण थोड्या वेळानी शांत झालं.
त्यानंतर रेफरीने टीम इंडियाचे कोच इगोर स्टिमॅक यांना रेड कार्ड (Red Card) दाखवले. तर पाकिस्तानच्या कोचला येलो कार्ड (Yellow Card) दाखवले. यासोबतच भारतीय डिफेंडर संदेश झिंगन आणि पाकिस्तानचा मिड फिल्डर राहिस नबी या दोघांनाही रेफरीने येलो कार्ड दाखवलं. त्यानंतर संपूर्ण सामना शांततेत पार पडला.
India vs Pakistan Football Match : भारताचे पुढील सामने :
सैफ चॅम्पियनशिप (SAFF Championship 2023) या स्पर्धेमध्ये एकूण आठ संघ आहेत. यामध्ये 4-4 संघांचे A आणि B असे दोन ग्रुप केले आहेत. भारताचा A ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे.
सैफ चॅम्पियनशिप 2023 ग्रुप
Group A : भारत, पाकिस्तान, कुवैत, नेपाळ
Group B : लेबनान, भूटान, मालदीव, बांगलादेश
आता भारताचे पुढील सामने कुवैत आणि नेपाळ संघासोबत होणार आहे.
India vs Pakistan Football Match : सैफ चॅम्पियनशिप स्पर्धेतही भारताचा दबदबा :
सैफ चॅम्पियनशिप या स्पर्धेचा संपूर्ण इतिहास पहिला तर या स्पर्धेत भारतीय संघाचाच दबदबा आपल्याला पाहायला मिळतो. भारताने आतापर्यंत तब्बल 8 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. भारताच्या आस्पासदेखील कोणी नाहीये. भारताने ही चॅम्पियनशिप पहिल्यांदा 1993 साली जिंकली होती. त्यानंतर 1997, 1999, 2005, 2009, 2011, 2015 आणि 2021 अशा एकूण आठ वेळा भारताने या चॅम्पियनशिपवर आपलं नाव कोरल आहे. भारतानंतर मालदीवने 2008 आणि 2018 ही चॅम्पियनशिप जिंकली होती तर बांगलादेशने 2003 मध्ये या चॅम्पियनशिपवर आपलं नाव कोरल होत.
दरम्यान, बंगळुरू येथे झालेला कालचा संपूर्ण सामना भारतीय संघाने गाजवला यात काही शंका नाही. त्यात सुनील छेत्रीने मारलेली हॅट्रिक ही सर्व चाहत्यांसाठी कायम स्मरणात राहणार आहे.